हिरो होंडा स्प्लेंडर NXG 19 हजारात, जुन्या गाड्यांचे भन्नाट पर्याय

जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही जुन्या गाड्या खरेदी करु शकता.

हिरो होंडा स्प्लेंडर NXG 19 हजारात, जुन्या गाड्यांचे भन्नाट पर्याय
Old Bikes
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 1:54 PM

मुंबई : भारतीय बाजारात सेकेंडहँड कारप्रमाणे दुचाकीलाही पसंती आहे. बजेट कमी असल्यामुळे अनेकांचा सेकेंडहँड बाईककडे कल असतो. काहीवेळा नवी बाईक घेण्यासाठीही जुनी बाईक विकली जाते. अशा वाहनधारकांचंही प्रमाण मोठं आहे. इतकंच नाही तर बाईक शिकण्यासाठीही जुनी बाईक खरेदी केल्याचं अनेकवेळा पाहायला मिळतं. (Second hand bike best option in budget)

जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही जुन्या गाड्या खरेदी करु शकता. ऑनलाईन फोर व्हिलर पाहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्या तुलनेत दुचाकीसाठीचे पर्याय कमी आहेत. जुनी बाईक खरेदी करण्यासाठी droom.in या वेबसाईटवर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दिल्ली परिसरात विक्रीला असलेल्या अनेक बाईक्स या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

तुम्हाला जी बाईक हवी आहे, त्या बाईकचे अनेक पर्याय या वेबसाईटवर पाहायला मिळतील. 20 ते 25 हजारांच्या रेंजमध्येही गाड्या उपलब्ध आहेत.

Hero Splendor NXG 100cc : या बाईकचं 2011 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फर्स्ट ओनर म्हणजेच गाडीच्या पहिल्याच मालकाकडून ही गाडी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या बाईकने 35,285 किमी प्रवास केला आहे. गाडीचं मायलेज 65 किमी प्रती लीटर इतकं आहे. या गाडीचं इंजिन 100 CC आहे. व्हील साईज 18 इंच असून, अवघ्या 19 हजार रुपयात ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Bajaj Discover 125M : या गाडीचं 2014 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकचं रनिंग 19500 किमी झालं आहे. या गाडीचं मायलेज 65 किमी प्रती लीटर इतकं आहे. या बाईकचं इंजिन 125 CC आहे. या बाईकची किंमत 24 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Honda Dream Neo 110cc : या बाईकचं 2013 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाईकच्या पहिल्या मालकाने ही विक्रीसाठी काढली आहे. या बाईकचं रनिंग 19,000 किमी झालं आहे. या गाडीचं मायलेज 84 किमी इतकं आहे. यामध्ये 110 सीसी इंजिन आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Note : वर दिलेल्या बाईक्सची माहिती, किमती या Droom वेबसाईटवरुन दिलेल्या आहेत. दिल्ली परिसरात या गाड्या उपलब्ध आहेत. जुन्या गाड्या खरेदी करताना कागदपत्र आणि गाडीची स्थिती स्वत: तपासून पाहा. गाडी मालकांना न भेटता, गाडी न पाहता ऑनलाईन खरेदी करु नये.

(Second hand bike best option in budget)

संबंधित बातम्या 

Volvo India ची मोठी घोषणा, आता डिझेल कार बनवणार नाही

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.