AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Second Hand Car : एक वर्षाची वॉरंटी अन्‌ 3 फ्री सर्व्हिसिंग, केवळ 75 हजारांत अल्टो घरी घेऊन जाण्याची संधी

तुम्हाला जर कमी किंमतीत चांगली सेकंड हँड कार पाहिजे असेल तर या लेखात तुम्हाला अनेक चांगले ऑप्शन मिळू शकतात. दोन लाखांपेक्षाही कमी किमतीत कार उपलब्ध आहेत. शिवाय त्यात मायलेजदेखील जबदस्त मिळणार आहे. या लेखातून चांगल्या डील्स असलेल्या कारची माहिती घेउया...

Second Hand Car : एक वर्षाची वॉरंटी अन्‌ 3 फ्री सर्व्हिसिंग, केवळ 75 हजारांत अल्टो घरी घेऊन जाण्याची संधी
Second Hand CarImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 04, 2022 | 6:59 PM
Share

मुंबई : भारतात नवीन कारसह (New car) सेकंड हँड कारचा बाजारदेखील तेजीत आला आहे. कोरोना काळानंतर तर कारला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. ज्या वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्या वेळी खासगी वाहनांचा मोठा आधार मिळाला. कोरोना काळात सर्वाधिक सेकंड हँड चारचाकी (Second hand car) वाहने विकली गेलीत. जर तुम्हीदेखील सेकंड हँड कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी आवर्जुन वाचा जर तुम्हाला कमी किमतीत चांगल्या कंडीशनमधील व चांगला मायलेज (Mileage) देणारी कार पाहिजे असेल तर तूमच्यासमोर आज आम्ही काही कारचे पर्याय देणार आहोत.

1) मारुती अल्टो 800

मारुती सुझुकी ट्रॅव्हल व्हेल्यू डॉट कॉम या वेबसाइटवर एक सेकंड हँड मारुती अल्टो 800 विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे 2017 चे मॉडेल आहे. ही कार केवळ 75 हजार किमी चालली असून या कारवर एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. याशिवाय 3 सर्व्हिसिंगही फ्री देण्यात आल्या आहे. या कारची किंमत केवळ 75 हजार रुपये आहे.

2) मारुती सुझुकी अल्टो 800

मारुतीची ही अल्टो कार एलएक्सआय व्हेरिएंटवर आधारीत आहे. ही ओला कार्सवर रजिस्टर करण्यात आलेली आहे. 2015 चे मॉडेल असून केवळ 58 हजार किमी चालली आहे. पेट्रोल इंजीन असलेल्या या कारची किंमत ओला कार्सवर केवळ 2.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

3) ह्युंडाई इऑन डी-लाइट

ही कार ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2013 चे मॉडेल असून आतापर्यंत 56 हजार किमी चालली आहे. याची किंमत 2.21 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

4) ह्युंडाई आय10 इरा

ह्युंडाईची आय10 इरा ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2013 चे मॉडेल असून आतापर्यंत 53 हजार किमी चालली आहे. हे एक पेट्रोल मॉडेल असून एक लाखांच्या डिस्काउंटवर केवळ 2.62 लाखांना उपलब्ध आहे.

5) वेगनआर एलएक्सआय

ही कारदेखील ओला कार्सवर लिस्टेड आहे. हे 2011 चे पेट्रोल इंजीन मॉडेल असून कार केवळ 42569 किमी चालली आहे. या कारची किंमत 219999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार तूम्ही महिन्याला केवळ 3915 रुपयांच्या ईएमआयवरही खरेदी करु शकतात.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ