AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric वाहन क्षेत्रासंबधी Tata Motorsचा भविष्यात मोठा प्लॅन! 5 वर्षात 15 हजार कोटींच्या गुंतवणुकीची योजना

हल्ली बाजारामध्ये ईलेक्ट्रिक वाहन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अनेक जण ईलेक्ट्रिक वाहनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. टाटा मोटर्स येणाऱ्या पाच वर्षांमध्ये पंधरा हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्लॅन आखत आहे.

Electric वाहन क्षेत्रासंबधी Tata Motorsचा भविष्यात मोठा प्लॅन! 5 वर्षात 15 हजार कोटींच्या गुंतवणुकीची योजना
टाटा मोटर्स इलेक्ट्रीक कार्समध्ये सध्या अग्रेसरImage Credit source: Social
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 4:38 PM
Share

टाटा मोटर्स (Tata Motors)ची येणाऱ्या पाच वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये (Electric Vehicles) 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आहे. टाटा मोटर्स प्रवासी वाहन उद्योगाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा (Shailesh Chandra) यांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा मोटर्स वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे भवितव्य आहे. या क्षेत्रात टाटा मोटर्सचे नेक्सन सारखे मॉडेल देखील आहेत. कंपनीने या शतकात अंदाजे 10 तरी नवीन उत्पादन बाजारात आणण्याची इच्छा आहे. चंद्रा यांनी म्हंटले की, भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास आम्ही विद्युतीकरणावर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये 15 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहोत.आम्ही अंदाजे 10 नवीन उत्पादनावर काम करणार आहोत. हे उत्पादन आकार, मूल्य इत्यादीच्या बाबतीत वेगळे असतील. कंपनीने आपल्या ईव्ही क्षेत्रासाठी व्यक्तिगत इक्विटी कंपनी कडून एक अब्ज डॉलर जमा केले आहे. या पद्धतीने जर विचार करायचा झाल्यास ईव्ही व्यवसायाचे मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर इतके आहे.

चंद्रा यांनी ने स्थानीक समूहातील औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) अंतर्गत शहरातील नागरिकांना 101 इलेक्ट्रिक वाहनांच्या डिलिवरी निमित्ताने आयोजित केला गेलेल्या कार्यक्रमात म्हंटले की, चार्जिंग सुविधांसह इलेक्ट्रिक वाहन पर्यावरणाच्या विकासाला गती देण्याची गरज आहे त्याचबरोबर कंपनीने ग्राहकांच्या प्रती असलेली वचनबद्धता बद्दल पुन्हा उल्लेख देखील केला.

इलेक्ट्रिक व्हेहीकल बद्दल लोकांच्या मनात सकारात्मक बदल

चंद्रा यांनी म्हंटले की, आता इलेक्ट्रिकल वाहन बद्दल लोकांच्या मनात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर अनेक ग्राहकांनी आपल्या वाहनांच्या पश्चात नवीन इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. जेव्हा आम्ही बाजारामध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती तेव्हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या 20 ते 25 टक्के होती आज हीच संख्या 65 टक्क्यांच्या वर गेलेली आहे.

डीजल कार चे शेअर सर्वात जास्त…

चंद्र यांनी म्हटले की सध्याच्या काळात कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये डिझेल कारची विक्री हिस्सा अंदाजे 50 टक्के आहे पेट्रोल आणि सीएनजी वाहनांचा हिस्सा 66 टक्के आणि 12 टक्के आहे उरलेले 7 टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. चंद्रा यांनी सांगितले की, पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये पेट्रोल सर्वसाधारणपणे 50 टक्केच्या वर येऊन जाईल, सीएनजी 20% पेक्षा पुढे जाईल. डिझेल अंदाजे दहा टक्के खाली येऊ शकतो, इलेक्ट्रिकल वाहनासाठी आमचे लक्ष 20 टक्के इतके आहे.

इन्फ्राचा सुद्धा वेगाने विकास

इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicles) ची वाढती मागणी आणि लोकप्रियता या दरम्यान देशात इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगाने विकास होत आहे.देशातील मोठ्या 9 शहरांमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनांची संख्या गेल्या चार महिन्यापेक्षा अडीच पटीने वाढवण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या :

सिंगल चार्जमध्ये 200KM रेंज, किंमत 1 लाखापेक्षा कमी, नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

Maruti आणि Toyota ची पहिली एसयूव्ही भारतात लाँचिंगसाठी सज्ज, लूक आणि डिझाईन लीक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.