Tata Motors cars: मार्चमध्ये टाटाच्या 42000 गाड्यांची विक्री, जाणून घ्या देशातल्या टॉप 5 कार

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 02, 2022 | 11:26 AM

टाटा मोटर्सने मार्च महिन्यात 42,295 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे, तर मार्च 2021 मध्ये कंपनीने 29,655 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने यंदा 43 टक्के वाढ नोंदवली आहे.

Tata Motors cars: मार्चमध्ये टाटाच्या 42000 गाड्यांची विक्री, जाणून घ्या देशातल्या टॉप 5 कार
Tata Punch Kaziranga SUV
Image Credit source: Tata Motors

Tata Motors cars price : टाटा मोटर्सने (Tata Motors) मार्च महिन्यातही विक्रीच्या बाबतीत मोठी कामगिरी केली आहे. मार्च अखेरपर्यंत, कंपनीने 42,295 युनिट्सची विक्री केली आहे, तर कंपनीने गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात म्हणजेच मार्च 2021 मध्ये 29,655 युनिट्सची विक्री केली होती. अशा स्थितीत कंपनीने यंदा 43 टक्के वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सने फेब्रुवारी 2022 मध्ये 39,980 युनिट्स कार विकल्या होत्या. देशांतर्गत वाहन निर्मात्या कंपनीने महिंद्रा (Mahindra), किया, टोयोटा, स्कोडा, एमजी आणि इतर अनेक ब्रँड्सना मागे टाकले आहे. देशात दुसरे स्थान ह्युंडईने (Hyundai) मिळवले आहे, ह्युंडईने 23005 युनिट्सची विक्री केली आहे.

टाटाचा बाजारातील हिस्सा 13.2 टक्के होता. टाटा मोटर्स ही कंपनी भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा नेक्सॉन, टाटा अल्ट्रॉझ, टाटा पंच, टियागो आणि सफारी या काही कारसह चांगली कामगिरी करत आहे. टाटा पंच ही एक छोटी SUV कार आहे आणि या कारची सुरुवातीची किंमत खूपच कमी असल्याने ती तिच्या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या कारने गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत दणक्यात एंट्री घेतली होती.

टाटाच्या ईव्हींना ग्राहकांची पसंती

2021 मध्ये, टाटा ने अपडेटेड Tigor EV सादर केली, तर Nexon EV कार सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार आहे. ही लाँग रेंज एसयूव्ही कार सिंगल चार्जमध्ये 400 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच, कंपनी यामध्ये एक मोठा बॅटरी बॅकअप देण्याचा विचार करत आहे, ज्यानंतर कारला अजून चांगली ड्रायव्हिंग रेंज मिळेल. टाटा सध्या तीन EV प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यामध्ये एक डेडीकेटेड स्केटबोर्ड देखील आहे.

टाटा 5 वर्षात 10 नवीन ईव्ही कार लाँच करणार

काही महिन्यांपूर्वी टाटाने टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड नावाच्या नवीन सबसिडी फर्मची घोषणा केली. यामध्ये कंपनीने बरीच गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे कंपनी येत्या पाच वर्षात 10 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते.

Kia ने मे महिन्यात 22 हजार युनिट्स कार विकल्या

कोरियन कंपनी Kia ने गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये 22,622 युनिट्स विकल्या आहेत. तर फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने 8,415 युनिट्सची विक्री केली होती. अलीकडेच कंपनीने थ्री-रो एमपीव्ही कार सादर केली आहे, जी 6-7 सीटर कार आहे.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI