AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata च्या SUV चा बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका महिन्यात 10,000 युनिट्सची विक्री

अलीकडच्या काळात भारतीय बाजारात मजबूत विक्रीसह टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Tata च्या SUV चा बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका महिन्यात 10,000 युनिट्सची विक्री
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 4:50 PM
Share

मुंबई : अलीकडच्या काळात भारतीय बाजारात मजबूत विक्रीसह टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या महिन्यात, ब्रँडने एकूण 28,017 प्रवासी वाहने विकली आणि नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही त्यांच्या लाइन-अपमधील सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल होते. ऑगस्ट 2021 मध्ये, टाटा नेक्सॉनने 10,006 युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला, जो नेत्रदीपक आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात, म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये, नेक्सॉनच्या एकूण 5,179 युनिट्सची विक्री झाली होती, या वर्षी ऑगस्ट महिन्यात वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर नेक्सॉनच्या विक्रीत तब्बल 93.20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. (Tata motors Sold Over 10,000 Units of Nexon in August 2021, recorded 93 percent YoY Growth)

तथापि, जुलै 2021 मध्ये 10,287 युनिट्सच्या विक्रीसह, एसयूव्हीची मासिक विक्री 2.73 टक्क्यांनी कमी झाली आहे. टाटा नेक्सॉनच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये. एसयूव्ही ड्युअल एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, चाइल्ड सेफ्टी लॉक, ट्रॅक्शन कंट्रोल, ईएससी, रोलओव्हर मिटीगेशन, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट, हिल असिस्ट इत्यादी अनेक स्टँडर्ड सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. या कारला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबतीच 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे आणि ग्लोबल NCAP द्वारे लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये 120hp पॉवर आणि 170Nm साठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 110hp आणि 260Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे. नेक्सॉनची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 7.28 लाख रुपये इतकी आहे.

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ

कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑगस्टमध्ये वाढून 57,995 युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 36,505 युनिट्स होती. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत अंडर रिव्ह्यू महिन्यात कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 53 टक्क्यांनी वाढून 54,190 युनिट्स झाली आहे. पुढे, कंपनीच्या एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये वाढून 29,781 युनिट झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 17,889 युनिट्स इतकी होती.

मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ

ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री ऑगस्टमध्ये 1,30,699 इतकी नोंदवण्यात आली आहे जी 2020 च्या याच महिन्यात 1,24,624 युनिट्स इतकी होती. ऑगस्ट महिन्यात एकूण विक्रीमध्ये 1,05,775 युनिट्सची घरगुती विक्री, 4,305 युनिट्सच्या इतर ऑरिजनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर (OEMs) ऑफ-टेक आणि 20,619 युनिट्सची निर्यात यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीच्या विक्रीचे प्रमाण प्रभावित झाले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिकूल परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी कंपनीने सर्व शक्य उपाय केले आहेत.

इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर परिणाम झाला, तर ऑगस्ट 2020 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर कोव्हिड -19 संबंधित अडथळ्यांमुळे परिणाम झाला.

MG Motor च्या विक्रीत तब्बल 51 टक्के वाढ

एस्कॉर्ट्सने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी एकूण 7,268 युनिट्सची विक्री केली होती. सणासुदीच्या काळात विक्रीत वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एमजी मोटरने सांगितले की, ऑगस्टमध्ये त्यांची किरकोळ विक्री 51 टक्क्यांच्या वाढीसह 4,315 युनिट्स होती. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने 2,851 युनिट्सची विक्री केली होती. अशोक लेलँडच्या विक्रीत 48 टक्के वाढ झाली. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण 9,360 वाहने विकली.

टोयोटाची विक्री दुप्पट

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) सांगितले की, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांची देशांतर्गत घाऊक विक्री दोन पटीने वाढली आणि 12,772 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 5,555 युनिट्सची विक्री केली होती. टीकेएम जॉइंट जनरल मॅनेजर (सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग) व्ही. व्हिसेलिन सिगामनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर त्यांच्या सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम ठेवत आहेत आणि दोन्ही मॉडेल्सना चांगली मागणी आहे. याशिवाय ग्लान्झा आणि अर्बन क्रूझरलाही चांगली मागणी दिसून येत आहे.

इतर बातम्या

Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार

Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, यादीत सँट्रो, i10 Nios चा समावेश

Kia Seltos आणि Sonet च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती

(Tata motors Sold Over 10,000 Units of Nexon in August 2021, recorded 93 percent YoY Growth)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.