Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 11:52 PM

एलोन मस्क यांनी कथितपणे म्हटले आहे की, ऑटोमेकर टेस्ला 2023 मध्ये पहिली 25,000 डॉलर्स इतक्या किंमतीची (अंदाजे 18 लाख) इलेक्ट्रिक कार सादर करण्याची योजना आखत आहे.

Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार
टेस्लाचे 'फुल सेल्फ-ड्रायव्हिंग' सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार

मुंबई : एलोन मस्क यांनी कथितपणे म्हटले आहे की, ऑटोमेकर टेस्ला 2023 मध्ये पहिली 25,000 डॉलर्स इतक्या किंमतीची (अंदाजे 18 लाख) इलेक्ट्रिक कार सादर करण्याची योजना आखत आहे. इलेक्ट्रेकने सांगितल्याप्रमाणे, सीईओने संकेत दिले आहेत की स्टीयरिंग व्हील नसेल. एलोन मस्कने पूर्वी नमूद केले होते की, नवीन बॅटरी सेल आणि बॅटरी विकसित करण्याच्या टेस्लाच्या प्रयत्नांमुळे हा नवीन प्राइस पॉइंट साध्य झाला आहे, ज्यामुळे बॅटरीची किंमत 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते. (Tesla may make cheap electric car worth 25000 USD without steering wheel)

$ 25,000 इतक्या किंमतीची टेस्ला इलेक्ट्रिक कार नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल अशी अपेक्षा आहे. या कारचे चीनमधील गिगाफॅक्टरी शांघाय येथे उत्पादन आणि जागतिक स्तरावर निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. टेक्सास पब्लिक युटिलिटी कमिशनकडे दाखल केलेल्या अर्जात, EV निर्मात्या कंपनीने त्यांच्या सहाय्यक टेस्ला एनर्जी व्हेंचर्स अंतर्गत रिटेल इलेक्ट्रिक प्रोव्हाइडर (REP) बनण्याची विनंती केली आहे. टेस्ला सध्या ऑस्ट्रेलिया आणि यूके मध्ये रिटेल इलेक्ट्रिक प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये डोमेस्टिक एनर्जी स्टोरेज इंटीग्रेट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ऑटो-टेक वेबसाइट इलेक्ट्रेकच्या मते, ऑटोमेकरने अलीकडेच पूर्ण टेस्ला एनर्जी इकोसिस्टम ऑफर करण्यासाठी थर्ड पार्टी इंस्टॉलर्सना सौर पॅनेल, पॉवरवॉल होम बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जरसह आपली संपूर्ण एनर्जी इकोसिस्टम देण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच भारतात एंट्री

भारतीय कार बाजाराला ईव्ही जायंट टेस्लाच्या एंट्रीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. वाहन निर्मात्या कंपनीने हे शक्य करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, कारण कंपनीला देशातील त्यांच्या चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास मान्यता मिळाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर पोस्टिंगचा संदर्भ देत, ब्लूमबर्गने नोंदवले आहे की, टेस्लाच्या चार मॉडेल्सना भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे.

वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेतील सुरक्षा आणि उत्सर्जन आवश्यकतांशी जुळतात. पोस्टिंगमध्ये असे म्हटले आहे की, “चाचणी हे सुनिश्चित करते की टेस्लाचे वाहन उत्सर्जन आणि सुरक्षा तसेच रस्त्याच्या योग्यतेच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेतील आवश्यकतांशी जुळते.” टेस्ला फॅन क्लबद्वारे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे, हे मॉडेल 3 आणि मॉडेल Y चे व्हेरिएंट्स आहेत.

इतर बातम्या

अपडेटेड Mahindra Scorpio पुढच्या वर्षी बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Renault कडून सर्व गाड्यांवर 80,000 रुपयांची सूट, KWID च्या बेस मॉडेलमध्ये नवं सेफ्टी फीचर

Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार

(Tesla may make cheap electric car worth 25000 USD without steering wheel)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI