AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जमध्ये तब्बल 590 किमी धावणार, Tata ची नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात

Tata Sierra EV Range: टाटा मोटर्सने (Tata Motors) 2020 ऑटो एक्सपोमध्ये नेक्स्ट जनरेशन टाटा सिएरा इलेक्ट्रिक (Tata Sierra Electric) कारचे अनावरण केले होते.

सिंगल चार्जमध्ये तब्बल 590 किमी धावणार, Tata ची नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात
Tata Sierra EV
| Updated on: Apr 04, 2022 | 2:02 PM
Share

Tata Sierra EV Range: टाटा मोटर्सने (Tata Motors) 2020 ऑटो एक्सपोमध्ये नेक्स्ट जनरेशन टाटा सिएरा इलेक्ट्रिक (Tata Sierra Electric) कारचे अनावरण केले होते. आता कंपनीने या कारसाठी प्री-बुकिंग्स घेण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. अशा स्थितीत ही कार लवकरच रस्त्यांवर धावताना दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 590 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. देशांतर्गत ऑटोमेकर कंपनी टाटा इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीच्या Nexon EV आणि Tigor EV या दोन गाड्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

टाटा मोटर्सने एक टीझर जारी केला असून, त्यात एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये New EV आणि Guess whats असे शब्द वापरले आहेत. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की ही नवीन ईव्ही म्हणजेच टाटा सिएरा ईव्ही असेल.

Tata Sierra EV मध्ये 69kWh क्षमतेची बॅटरी

या आगामी इलेक्ट्रिक SUV कारमध्ये 69kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दोन सेक्शनमध्ये विभागली गेली आहे. एका सेक्शनमध्ये बॅटरी फ्लोरमध्ये सेट करण्यात आली आहे, तर दुसरी बोट प्लोर अंतर्गत वापरण्यात आली आहे. ही कार FWD (सिंगल इलेक्ट्रिक मोटर) आणि AWD (टू इलेक्ट्रिक मोटर्स) या दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. पॉवर आउटपुटची माहिती कंपनी लॉन्चिंगदरम्यान उघड करेल.

टाटा सिएरा ईव्हीचे फीचर्स

Tata Sierra EV ची लांबी 4.1 मीटर आहे, ज्यामुळे ही कार Hyundai Creta च्या तुलनेत कॉम्पॅक्ट बनते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 12.12 इंचांची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आहे. यात IRA Place Pro Connect फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 7.7-इंचांची प्लाझ्मा स्क्रीन वापरण्यात आली आहे, जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसेच, या कारमध्ये एक मोठं पॅनोरमिक सनरूफ देण्यात आलं आहे.

360 डिग्री व्ह्यू कॅमेरा

या कारला 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळेल, ज्याच्या मदतीने युजर्सना सहज पार्किंग आणि रिव्हर्सिंग एक्सपीरियन्स मिळेल. तसेच यात 19 इंची चार अलॉय व्हील वापरण्यात आले आहेत. नवीन Sierra EV ब्रँडच्या सिग्मा प्लॅटफॉर्मवर तयार केलेली कार आहे. या कारमध्ये हाय स्पीड वॉर्निंग सेन्सर आहे. यामध्ये यूजर्सना टर्न इंडिकेटर आणि डोर ओपेनिंग वॉर्निंग साउंडदेखील मिळेल.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.