AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत येताच ‘टेस्ला’चं जय महाराष्ट्र; जाणून घ्या गाड्यांचे मॉडेल्स अन् किंमत

जगविख्यात टेस्ला कंपनीचं पहिलं शोरुम भारतात सुरू होणार असून मुंबईतील बीकेसीमध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. टेस्लाच्या या शोरुमची पाटी मराठीत असल्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. इथे कोणत्या गाड्यांचे मॉडेल्स असतील आणि त्यांची किंमत काय असेल, ते जाणून घ्या..

मुंबईत येताच 'टेस्ला'चं जय महाराष्ट्र; जाणून घ्या गाड्यांचे मॉडेल्स अन् किंमत
इलॉन मस्क आणि टेस्लाImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2025 | 11:25 AM
Share

इलॉन मस्कची जगप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ आज भारतात धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी (15 जुलै) मुंबईत या कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरुमचं उद्घाटन होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या पॉश परिसरात टेस्लाचा पहिला शोरुम सुरू होणार आहे. या शोरुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून होणार आहे. शोरुममध्ये टेस्लाचे एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स उपलब्ध असतील. त्यात मॉडेल 3, मॉडेल Y आणि मॉडेल X ची यांचा समावेश असू शकतो. विशेष म्हणजे भारतातील टेस्लाच्या पहिल्या शोरुमची पाटी मराठीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शोरुमची पाटी मराठी भाषेत आहे. टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करण्यात आलं आहे.

टेस्लाच्या कोणत्या गाड्या शोरुमध्ये दाखल होणार?

सध्या मॉडेल्सच्या नावांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी ‘टेस्ला’ सर्वांत आधी त्यांच्या मॉडेल Y ला भारतात लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याची आयात चीनमधून केली जाणार असल्याने भारतात त्यावर जवळपास 70 टक्के आयात शुल्क असेल. यामुळे भारतात कारची किंमत बरीच वाढू शकते. परंतु येत्या काळात ही कंपनी स्थानिक उत्पादनावरही विचार करू शकते, ज्यामुळे किंमतीत घट होऊ शकते. टेस्लाच्या आगमनाने भारतातील ऑटोमोबाइल मार्केटमध्ये तंत्रज्ञान आणि स्टाइल या दोन्ही गोष्टी एका नव्या पातळीवर पोहोचतील, असं तज्ज्ञांकडून म्हटलं जातंय.

शोरुमचं भाडं किती?

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला कंपनीने 4000 स्क्वेअर फूटच्या रिटेल जागेला पाच वर्षांसाठी लीजवर घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला दर महिन्याला जवळपास 35.26 लाख रुपये भाडं द्यावं लागणार आहे. तर दर वर्षी शोरुमच्या भाड्यात 5 टक्क्यांची वाढ होणार असल्याचंही कळतंय. जे पाच वर्षांमध्ये 43 लाख प्रति महिन्यापर्यंत पोहोचू शकतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल Y आणि मॉडेल 3 या टेस्लाच्या दोन प्रसिद्ध मॉडेल्स या शोरुममध्ये दिसतील. मॉडेल Y ही देशात विकली जाणारी पहिली टेस्लाची कार असेल. याची आयात चीनमधून करण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स लोकप्रिय आहेत. मॉडेल Y मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD (Dual Motor) हे दोन प्रकार आहेत. रेंज आणि परफॉर्मन्स ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 574 किलोमीटरपर्यंत धावते. तसंच ती फक्त 4.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते, ज्यामुळे ही कार अत्यंत चपळ इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ओळखली जाते.

या कारमध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स आहेत. याला स्टँडर्ड प्लस आणि लाँग रेंजमध्येही लाँच केलं जाऊ शकतं. टेस्लाच्या मॉडेल 3 चा वेग ताशी 162 किलोमीटर आहे. या कारची खासियत म्हणजे ती फक्त 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग वाढवू शकते. अमेरिकेत टेस्ला मॉडेल 3 ची किंमत 29,990 डॉलर (25.99 लाख रुपये) इतकी आहे. भारतात त्याची किंमत सुमारे 29.79 लाख रुपये असू शकते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.