AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाची सर्वात स्वस्त कार झाली आणखी स्वस्त, 34 KM मायलेजसह 6 एअरबॅग सेफ्टी

Maruti Suzuki Alto K10: देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकी ऑल्टो k 10 ची एक्स शोरुम किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरु होते. टॉप मॉडेलची किंमत 6 लाख 21 हजार रुपये इतकी आहे. आता ती आणखी स्वस्त झाली आहे.

देशाची सर्वात स्वस्त कार झाली आणखी स्वस्त, 34 KM मायलेजसह 6 एअरबॅग सेफ्टी
| Updated on: Jul 07, 2025 | 6:00 PM
Share

Maruti Suzuki Alto on Discount : दारी चारचाकी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्याच्या घडीला भारतीय बाजाराचा विचार करता सर्वात स्वस्त कारमध्ये मारुती सुझुकी ऑल्टो K10 कारचे नाव सर्वात टॉपवर आहे.जर तुम्हाला दररोज ऑफीस ये-जा करायची असेल तर जास्त मायलेज देणारी ही कार सर्वात स्वस्त आहे. जर तुम्ही मारुती सुझुकी ऑल्टो K10 कार खरेदी करु इच्छीत असाल तर मारुतीने या महिन्यात ऑल्टो कारवर बंपर डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

दिल्ली – एनसीआरच्या स्थानिय डिलरशिपच्या मते ऑल्टो च्या पेट्रोल म्यॅन्युअर व्हेरीएंटवर 62 हजार 500 रुपयांची तर ऑटोमेटिक व्हेरीएंटवर 67 हजार 500 रुपये आणि सीएनजी ( मॅन्युअल ) वेरिएंटवर 62 हजार 500 रुपयांपर्यंत सुट मिळाली आहे. गाडीत कॅश डिस्काऊंट शिवाय एक्सचेंज ऑफर्स आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे.

देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत काय ?

मारुती सुझुकी ऑल्टो K10 ची एक्स- शोरुम किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरु होते. आणि टॉप मॉडेलसाठी ही किंमत 6 लाख 21 हजार रुपये आहे. याच्या LXi S-CNG वेरिएंटची किंमत 5 लाख 90 हजार रुपये एक्स शोरुम आहे.

मारुती सुझुकी ऑल्टो K10 मध्ये कंपनीने 1.0 लिटरचे 3 सिलेंडरवाले इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीचे मॅक्स पॉवर जनरेट करते. आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यासह यास 5 – स्पीड मॅन्युअल वा एएमटी गिअरबॉक्ससह कनेक्ट केलेले आहे.

किती मायलेज देते मारुती सुझुकी ऑल्टो?

या कारमध्ये सीएनजीचा देखील पर्याय दिला जात आहे. कंपनीच्या मते या कंपनीच्या पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 25 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर या कारचे सीएनजी व्हेरिएंट 33 किमीपर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

वैशिष्ट्ये काय ?

मारुती सुझुकीच्या कारचे फिचर्स पाहाता या कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट पॉवर विण्डो, पार्किंग सेंसॉर, सेंट्रल कंसोल आर्मरेस्ट, गिअर शिफ्ट इंडिकेटर, एडजस्टेबल हेडलँप, हॅलोजन हँडलँप, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक्स, ड्युअल एअर बॅग सारखे चांगले फिचर्स दिलेले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.