68 kmpl मायलेजसह दमदार फीचर्स, ‘या’ तीन स्कूटर्ससमोर बाकीच्या गाड्या फेल

बाजारात तुम्हाला कमी बजेटमध्ये अनेक पॉवरफुल स्कूटर सापडतील ज्यात होंडा अॅक्टिव्हा, सुझुकी अॅक्सेस आणि इतर स्कूटरचा समावेश आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी असे तीन पर्याय घेऊन आलो आहोत जे तुम्हाला लगेच आवडतील.

68 kmpl मायलेजसह दमदार फीचर्स, 'या' तीन स्कूटर्ससमोर बाकीच्या गाड्या फेल
Best Mileage Scooters
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 5:00 PM

मुंबई : सध्या बाजारात बाइकपेक्षा स्कूटरची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, जर एखाद्या कुटुंबाने स्कूटर घेतली तर घरात उपस्थित महिला आणि मुले देखील स्कूटर चालवू शकतात. आजकाल तुम्हाला कमी बजेटमध्ये अनेक पॉवरफुल स्कूटर सापडतील ज्यात होंडा अॅक्टिव्हा, सुझुकी अॅक्सेस आणि इतर स्कूटरचा समावेश आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी असे तीन पर्याय घेऊन आलो आहोत जे तुम्हाला लगेच आवडतील. (These 3 scooters will give you 68 kmpl mileage, Yamaha Fascino 125, RayZR 125, Jupiter 125)

या तिन्ही स्कूटर 125 सीसीच्या आहेत आणि या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्याच वेळी, त्यांची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे मायलेज. जबरदस्त डिझाईन असलेल्या या स्कूटरमध्ये शक्तिशाली इंजिन्स देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या तीन स्कूटर्सबद्दल

Yamaha Fascino 125 Hybrid

यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) अलीकडेच देशात नवीन Fascino 125 Hybrid स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरच्या बेस ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 70,000 रुपये इतकी आहे. कंपनीने एक डिस्क ब्रेक ट्रिमदेखील लाँच केलं आहे आणि त्याची किंमत 76,530 रुपये इतकी आहे (दोन्ही किंमती एक्स शोरूम दिल्लीतल्या आहेत). नवीन Yamaha Fascino 125 Hybrid मध्ये अतिरिक्त फंक्शनेलिटीसह स्मार्ट मोटर जेनरेटर (SMG) सिस्टम मिळते. जेव्हा स्टॉपपासून रायडर गाडी स्टार्ट करुन पॉवर असिस्ट देतो तेव्हा SMG एक इलेक्ट्रिक मोटर म्हणून काम करते, क्लायंबिंगदरम्यान ते फायदेशीर ठरते.

नवीन Fascino 125 FI हायब्रिड 125 cc, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिनद्वारे संचालित आहे, जे 8 hp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करतं. नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलच्या 9.7 एनएमपेक्षा जास्त टॉर्क ऑफर करतं. या व्यतिरिक्त, स्कूटरला स्टँडर्ड साइड स्टॉप इंजिन कट-ऑफ स्विच मिळतो. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिस्क ब्रेक व्हर्जन व्हिव्हिड रेड स्पेशल, मॅट ब्लॅक स्पेशल, कूल ब्लू मेटॅलिक, डार्क मॅट ब्लू, सुवे कॉपर, यलो कॉकटेल, सायन ब्लू, व्हिव्हिड रेड आणि मेटॅलिक ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. दुसरीकडे, ड्रम ब्रेक ट्रिम विविध रंगांमध्ये जसे की विव्हिड रेड, कूल ब्लू मेटॅलिक, यलो कॉकटेल, डार्क मॅट ब्लू, सुवे कॉपर, सायन ब्लू आणि मेटलिक ब्लॅक मध्येदेखील उपलब्ध आहे. ही स्कूटर 68.75 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

Yamaha RayZR 125

यामाहाने दोन महिन्यांपूर्वी RayZR 125 Fi हायब्रिड आणि स्ट्रीट रॅली 125 Fi हायब्रिड स्कूटर लाँच केल्या आहेत. या स्कूटर्सची किंमत 76,830 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. दोन्ही स्कूटर एकाच एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड (Fi), 125 सीसी ब्लू कोर इंजिनमधून पॉवर घेतात. जे 6,500 आरपीएमवर 8.2 पीएस आणि 5,000 आरपीएमवर 10.3 एनएम टॉर्क निर्माण करते. ही स्कूटर 66 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

यामाहा स्कूटरच्या वैशिष्ट्यांमध्ये इंजिन स्टार्ट सिस्टम, ऑटोमॅटिक स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम, एलईडी लाइटिंग, युनिफाइड ब्रेक सिस्टीम (यूबीएस), साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच आणि यामाहा मोटरसायकल कनेक्ट एक्स एपीपीसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. जपानी दुचाकी निर्मात्या कंपनीचा दावा आहे की, स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञान ऑटो इंजन स्टार्ट / स्टॉपमध्ये मदत करते, तसेच स्टॉपवरुन ​​​​एक्सीलरेट करत तीन सेकंदासाठी पॉवर असिस्ट इनेबल करते. 2021 Yamaha RayZR 125 Hybrid डिस्क ब्रेक व्हेरिएंटमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी पोझिशन लॅम्प, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यामाहा मोटर कनेक्ट एक्स (Yamaha Motor Connect X) अॅप्लिकेशन सारखी वैशिष्ट्ये आहेत. डिस्क व्हेरियंटला साइड स्टँड इंजिन कट-ऑफ देखील मिळते. लेटेस्ट अपडेटसह स्कूटरचे एकूण वजन 99kgs (kerb) इतके आहे.

TVS Jupiter 125

TVS कंपनीने ज्यूपिटर 125 मध्ये पेट्रोलसाठी नविन पर्याय दिले आहेत. या आधी पेट्रोल भरण्याचा पर्याय गाडीच्या मागच्या बाजूस होता. परंतू आता या गाडीमध्ये पेट्रोल भरण्याचा पर्याय ठीक हँन्डलच्या खालच्या बाजूस देण्यात आला आहे. कंपनीचे हे मॉडेल मॉडल ड्रम, ड्रम एलॉय आणि डिस्क व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यूपिटर 125 ला एक युनिक लूक देण्यासाठी कंपनीने मॉडेलला क्रोम टच दिला आहे. साईड मिररला जबदस्त असे दोन कलर देण्यात आले आहेत. साईड मिररमध्ये एलईडीचा वापर करण्यात आला आहे. ज्यूपिटर 125 ऑरेंज, सफेद, ग्रे , रंगामध्ये उपलब्ध आहे.

ज्यूपिटर 125ला 124.8 ccचे इंजिन देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये सिंगल सिलिंडर आणि 3 स्टेप अॅडजस्टेबल रियर शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. ज्यूपिटर 125 ला 33 लिटरची डिक्की देण्यात आली आहे . यामध्ये तुम्ही 2 हेल्मेट आरामात ठेवू शकता. या गोष्टीमुळेच ही एक परफेक्ट 2 – व्हिलर आहे. ज्यूपिटर 125 ची शोरुममधील किंमत 73,400 रूपयांपासून सुरू होत आहे. ही स्कूटर 63 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(These 3 scooters will give you 68 kmpl mileage, Yamaha Fascino 125, RayZR 125, Jupiter 125)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.