‘या’ आहेत देशातील टॉप 10 स्कूटर्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Top-Selling Scooters In India In February 2021)

‘या’ आहेत देशातील टॉप 10 स्कूटर्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
Top 10 most selling Scooters
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 11:43 AM

मुंबई : भारतीय ग्राहकांनी सुरुवातीपासूनच स्कूटरला त्यांची पसंती दर्शवली आहे. त्यामुळे देशातील अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी स्कूटरप्रेमी ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक नवनवीन स्कूटर लाँच केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक खरेदी केलेल्या 10 स्कूटर्सची यादी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हाने (Honda Activa) पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. भारतीय ग्राहकांनी या स्कूटरला सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील टॉप 10 स्कूटर्सबाबतची माहिती. (Top 10 most selling Scooters in India in February – Honda Activa Continues To Remain Top-Ranked)

या यादीत होंडा अॅक्टिव्हाचा नंबर पहिला आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने होंडा अॅक्टिव्हाच्या एकूण 2,09,389 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही आकडेवारी 2,22,961 युनिट्स इतकी होती. या स्कूटरच्या विक्रीत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 6 टक्क्यांनी घट झाली आहे. या यादीत दुसरा नंबर टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) या स्कूटरचा लागतो. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये या स्कूटरच्या 52,189 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या 31,440 युनिट्स इतकी होती. कंपनीने विक्रीत यंदा 66 टक्के वाढ नोंदविली.

Suzuki Access तिसऱ्या Honda Dio चौथ्या स्थानी

सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सच्या यादीत तिसरा क्रमांक सुझुकी अॅक्सेसचा आहे, कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये या स्कूटरच्या 48,496 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी हा आकडा 50,103 युनिट्स इतका होता. विक्रीच्या बाबतीत यंदा 3.21 टक्के घट झाली आहे. चौथ्या क्रमांकावर होंडा डीओ ही स्कूटर आहे, कंपनीने या स्कूटरच्या 28,171 युनिट्सची विक्री नोंदविली आहे, तर मागील वर्षी हा आकडा 26,494 युनिट्स इतका होता. वाहन विक्रीत यंदा 6 टक्के वाढ झाली आहे.

Hero Pleasure पाचव्या क्रमांकावर

यादीतील पुढचा क्रमांक हिरो प्लेजरचा (Hero Pleasure ) आहे. कंपनीच्या विक्रीत 174 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर यामाहा रेच्या (Yamaha Ray) विक्रीतही 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुढील क्रमांकावर हिरो डेस्टिनी, यामाहा Fascino, सुझुकी Burgam आणि टीव्हीएस स्कूटर पेप + या स्कूटर्स आहेत. यामाहा आणि होंडा अॅक्टिव्हा व्यतिरिक्त इतर सर्व स्कूटर्सच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर टीव्हीएस स्कूटर पेप + च्या विक्रीत 1588 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

‘या’ आहेत देशातील टॉप 10 बाईक्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

Maruti, Hyundai, Bajaj Auto ची फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री, वाहन कंपन्यांचा Sales Report जारी

‘या’ वाहन कंपनीचा भारतीय मार्केटवरील दबदबा कायम, अवघ्या 28 दिवसात 1.64 लाख गाड्यांची विक्री

(Top 10 most selling Scooters in India in February – Honda Activa Continues To Remain Top-Ranked)
Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.