AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात

भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. (2021 Maruti Suzuki Swift Facelift)

7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात
2021 Maruti Suzuki Swift Facelift
| Updated on: Feb 25, 2021 | 12:43 PM
Share

मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार 2021 Maruti Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन फ्रंट फॅसिआसह (front fascia) सदर करण्यात आली आहे. कारमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल देखील सादर केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,73,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. (Top 7 Changes In 2021 Maruti Suzuki Swift Facelift)

Maruti Suzuki Swift या हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचा (Maruti Suzuki Swift) मिडलाईफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे. आता भारतातही या कारची विक्री सुरु करण्यात आली आहे.

मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक कार स्विफ्ट पूर्णपणे नवीन अवतारात बाजारात दाखल केली आहे. नवीन 2021 Maruti Swift फेसलिफ्ट 5 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. नवीन रंग, नवीन इंजिन आणि बर्‍याच नव्या वैशिष्ट्यांसह नवी स्विफ्ट सादर करण्यात आली आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला या कारमधील 7 अशी वैशिष्ट्ये (फीचर्स) सांगणार आहोत जेणेकरुन तुम्हाला या वाहनात कंपनीने केलेले नवे बदल सहजपणे कळतील.

बाहेरचा लूक

हे मिडलाईफ रिफ्रेश असल्यामुळे या कारच्या डिझाईनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. या कारचा समोरचा भाग थोडा अद्ययावत (अपडेट) करण्यात आला आहे, त्यामुळे समोरुन कार थोडी बलल्याचे जाणवते. कारच्या फ्रंट ग्रीलमध्ये तुम्हाला नवीन मेश डिजाइन मिळेल. बोल्ड क्रोम स्ट्रिप रेडिएटर ग्रीलला दोन भागांमध्ये विभागतं. पूर्वीच्या कारच्या तुलनेत ही कार आता अधिक स्पोर्टी बनली आहे.

पॉवरट्रेन

2021 मध्ये मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये कंपनीने 1.2 लीटर फोर सिलिंडर K सीरीज ड्युअल जेट इंजिन दिले आहे जे स्टार्ट-स्टॉप फीचरसह येते. आपल्याला इंजिनमध्ये 90 PS पॉवर मिळेल, तर पीक टॉर्क 113Nm आहे. ही कार 5 स्पीड एएमटी किंवा पर्यायी 5 स्पीड एएमटीसह घेतली जाऊ शकते.

मायलेज

या कारचं इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह आहे, जे इंधन कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल. कंपनीचा असा दावा आहे की सुधारित (अपडेटेड) स्विफ्टला मॅन्युअल गिअरबॉक्ससह 23.20 किमी / ली आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह 23.76 किमी / ली इतकं मायलेज मिळेल.

वैशिष्ट्ये

2021 स्विफ्ट VXi मध्ये एक नवीन ऑडिओ हेड युनिट मिळाले आहे, जे वॉल्यूम आणि ट्रॅक बदलांसाठी फेदर-टच कंट्रोलसह येते. यात पूर्वीप्रमाणेच ब्लूटूथ, यूएसबी आणि AUX कनेक्टिव्हिटी आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंट क्रूझ कंट्रोल, कलर एमआयडी आणि ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएमसह येईल. कारमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, 7.0 इंच टचस्क्रीन, कीलेस एन्ट्री आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा यांसह अनेक वैशिष्ट्यांचा (फीचर्स) समावेश करण्यात आहे.

सेफ्टी फीचर्स

या कारमध्ये EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रियर कॅमेरा, ISOFIX चाईल्ड सीट अँकर सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्विफ्ट फेसलिफ्टमधील AMT व्हेरिएंटवर हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल नियंत्रण देखील मानक म्हणून दिले गेले आहे.

किंमत

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारच्या मॅन्युअल ट्रिमची किंमत 5.73 लाख रुपये आणि 7.91 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्या तुलनेत एजीएस व्हेरिएंटची किंमत 6.86 लाख ते 8.41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

कलर ऑप्शन

पर्ल मेटॅलिक ल्युसेंट ऑरेंज, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक मॅग्मा ग्रे, सॉलिड फायर रेड, पर्ल मेटॅलिक मिडनाइट ब्लू आणि पर्ल आर्टिक व्हाइट अशा 6 वेगळ्या सिंगल-टोन पेंट स्कीममध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट सादर करण्यात आली आहे. त्याच वेळी, आपल्याला तीन ड्युअल टोन कलर ऑप्सन्सदेखील मिळतील.

इतर बातम्या

2021 Maruti Swift बाजारात दाखल, नव्या फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत…

शानदार ऑफर! 4 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 2.15 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

नव्या बदलांसह TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर, जाणून घ्या काय आहे खास

(Top 7 Changes In 2021 Maruti Suzuki Swift Facelift)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.