Bikes : सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईक्स कोणत्या? जाणून घ्या विक्रीचं गणित आणि टॉप फाईव्ह बाईक

गेल्या महिन्यात Royal Enfield ने 650 Twins पैकी 2 हजार 159 युनिट्स विकल्या गेले. एप्रिल 2021च्या तुलनेत 866 युनिट्स अधिक होते.

Bikes : सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईक्स कोणत्या? जाणून घ्या विक्रीचं गणित आणि टॉप फाईव्ह बाईक
टॉप फाईव्ह बाईक्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 2:19 PM

मुंबई : तुम्ही जर शक्तिशाली मोटरसायकल शोधत असाल तर बाजारात कोणत्या बाईकला (Bikes)सर्वाधिक मागणी आहे. हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. कारण Hero, Honda, Bajaj, TVS 100cc ते 150cc पर्यंतच्या बाईक्सवर देखील तुम्ही वाटेल. पण 500cc सेगमेंटमध्ये या गोष्टी पूर्ण बदलतात. येथे रॉयल एनफिल्ड (Royal Enfield), कावासाकी (Kawasaki), होंडा, ट्रायम्फ यांसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. एप्रिल 2022 मध्ये 500cc आणि त्यावरील सेगमेंटमध्ये 2 हजार 485 मोटारसायकली विकल्या गेल्या आहेत. त्यात रॉयल एनफिल्डचा दबदबा मोठा होता. या मोटरसायकलचा टॉप स्पीड 250Km/h पर्यंत आहे. त्याच वेळी 3.3 सेकंदात 0 ते 100Km/ताशी वेग पकडते. आम्ही तुम्हाला टॉप-पाच सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईकची यादी सांगणार आहोत.

1. Royal Enfield 650 Twins

गेल्या महिन्यात Royal Enfield ने 650 Twins पैकी 2 हजार 159 युनिट्स विकल्या गेले. एप्रिल 2021 च्या तुलनेत ही 866 युनिट्स अधिक होती. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने आपल्या 1 हजार 293 युनिट्सची विक्री केली. म्हणजेच या मोटरसायकलला 66.98 टक्के मोठी वाढ मिळाली आहे. एप्रिल 2022 मध्ये 500cc+ सेगमेंटमध्ये त्याचा बाजार हिस्सा 86.88 टक्के इतका होता.

2. Kawasaki Versys 650

गेल्या महिन्यात Kawasaki ने Versys 650 च्या 47 युनिट्सची विक्री केली. एप्रिल 2021च्या तुलनेत हे 34 युनिट्स अधिक होते. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने त्यातील 13 युनिट्सची विक्री केली. म्हणजेच, या मोटरसायकलला 261.54 टक्के जबरदस्त वाढ मिळाली आहे. एप्रिल 2022 मध्ये 500cc+ सेगमेंटमध्ये त्याचा बाजार हिस्सा 1.89% इतका होता.

हे सुद्धा वाचा

3. Kawasaki Z900

गेल्या महिन्यात Kawasaki ने Z900 चे 38 युनिट्स विकले. एप्रिल 2021 च्या तुलनेत हे 37 युनिट कमी होते. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने त्यातील 75 युनिट्सची विक्री केली. म्हणजेच या मोटरसायकलला 49.33 टक्के घसरण झाली आहे. एप्रिल 2022 मध्ये 500cc+ विभागातील त्याचा बाजार हिस्सा 1.53 टक्के इतका होता.

4. Honda CBR 650

गेल्या महिन्यात Honda ने CBR 650 चे 33 युनिट्स विकले. एप्रिल 2021 च्या तुलनेत हे 6 युनिट अधिक होते. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने त्यातील 27 युनिट्स विकल्या. म्हणजेच, या मोटरसायकलला 22.22 टक्के धमाकेदार वाढ मिळाली आहे. एप्रिल 2022 मध्ये 500cc+ सेगमेंटमध्ये त्याचा बाजार हिस्सा 1.33 टक्के इतका होता.

5. ट्रायम्फ टायगर 660

गेल्या महिन्यात ट्रायम्फने टायगर 660 च्या 27 युनिट्सची विक्री केली. कंपनीने ही बाईक यावर्षी लाँच केली आहे. एप्रिल 2022 मध्ये 500cc+ विभागातील त्याचा बाजार हिस्सा 1.09 टक्के इतका होता. ट्रायम्फची ही सर्वात यशस्वी मोटरसायकल देखील होती.

त्यामुळे कोणतीही दुचाकी घ्यायची असल्यास आधी वरील माहिती घ्या. त्यानंतर खेरदी करा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.