AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगार वाढला, Tax पण वाढणार, अशावेळी पैसे कुठे गुंतवायचे? जास्त रिर्टन्स कसे मिळवायचे? त्यासाठी ही बातमी वाचा

गुंतवणुकदाराला जास्त परतावा हवा असेल तर ईएलएसएस त्याच्यासाठी एक उत्तम योजना आहे. ही अशी योजना आहे, ज्यामध्ये इक्विटीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जाते.

पगार वाढला, Tax पण वाढणार, अशावेळी पैसे कुठे गुंतवायचे? जास्त रिर्टन्स कसे मिळवायचे? त्यासाठी ही बातमी वाचा
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: May 20, 2022 | 2:08 PM
Share

मे महिना अनेक नोकरदारांसाठी पगारवाढ आणि पदोन्नतीसाठी (Salary hike and promotion) सुवर्णकाळ मानला जातो. प्रत्येक क्षेत्रातील सर्वच संस्थांमध्ये सध्या वार्षिक पगारवाढीची प्रक्रिया सुरू आहे. पगार वाढवल्याने तुमच्या 2 लाईफस्टाईलमध्ये तर बदल होतोच, पण त्याचबरोबर कर दायित्वाचा (Tax liability) भारही वाढतो. पगारवाढीबरोबरच नव्या व्यावसायिकांसाठी भविष्यातील आर्थिक नियोजन (Investment tips) देखील सुरू होते. जर हे नियोजन योग्य प्रकारे केलं नाही, तर तुमचं भविष्य सुरक्षित राहत नाही. तर दुसरीकडे महागाईचा (Inflation) आगडोंब उसळला असून महागाई 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत करबचत आणि भविष्यातील आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केले नाही, तर पगारवाढीच्या रुपाने मिळालेली पुंजी चकटफू व्हायला वेळ लागणार नाही. तर चला जाणून घेऊयात पगारवाढीचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल ते…

गुंतवणुकीच्या दृष्टीने कलम 80सी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सल्ला वित्तीय तज्ज्ञ देतात. ही मर्यादा दीड लाख रुपये आहे. या करबचत विभागाची व्याप्ती बरीच मोठी आहे. मुदत ठेव हे गुंतवणुकीचे पारंपरिक साधन आहे. मात्र, त्यातून खूप कमी परतावा मिळतो. त्या तुलनेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Scheme), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) यांसारख्या अल्पबचत योजनांवरील परतावा अधिक आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला सध्या वार्षिक 7.1 टक्के परतावा मिळतो. व्याज दर तिमाही आधारावर निश्चित केला जातो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 6.8% परतावा देते. दोन्ही योजना कलम 80 सी अंतर्गत येतात. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. तुमच्या खात्यात व्याज जमा होत नाही, ते पुन्हा गुंतवले जाते. पहिली चार वर्षे व्याजावर कर लागत नाही. मात्र पाचव्या वर्षाचे व्याज उत्पन्न आपल्या एकूण उत्पन्नात समाविष्ट होईल आणि टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असेल.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स

गुंतवणुकदाराला जास्त परतावा हवा असेल तर ईएलएसएस त्याच्यासाठी एक उत्तम योजना आहे. ही अशी योजना आहे, ज्यामध्ये इक्विटीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जाते. त्यातही अधिक परतावा मिळतो आणि गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांपेक्षा जोखीमही अधिक असते. 3 वर्षांचा किमान लॉक-इन कालावधी असून यामध्ये गुंतवणूक केल्यावर

कलम 80 सी अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो

गुंतवणुकीच्या दीर्घ कालावधीमुळे नकारात्मक परताव्याची शक्यता कमी असते. आर्थिक तज्ज्ञ एसआयपीच्या मदतीने ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईएलएसएसमधून मिळणारे उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत मोफत असते.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली

कलम 80 सीची व्याप्ती खूप मोठी असल्याने त्यात स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी (VPF) गृहकर्जाची मूळ रक्कम, मुलांची शैक्षणिक शुल्क अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल तर दीड लाखाची मर्यादा सहज गाठली जाते. तुमची मर्यादाही गाठली गेली असेल तर NPS अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टिम हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. ही निवृत्ती योजना आहे. तुमच्या जोखमीनुसार इक्विटी, सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँड, सिक्युरिटीज अशा वेगवेगळ्या अॅसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करता येते. इक्विटीमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा 75 टक्के आहे. NPS मध्ये गुंतवणूक केल्यास कलम 80CCD(1B) अंतर्गत एका आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांची अतिरिक्त वजावट मिळते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.