Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या इलेक्ट्रिक कारने दिग्गजांना आणला फेस, 3.2 सेंकदातच सूसाट धावणार

MG Cyberster : भारतीय बाजारात एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार दाखल झाली आहे. भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजार कक्षा रुंदावत आहे. त्यात या कारची भर पडली आहे. ही कार एकदा चार्जिंग केल्यावर 580 किमीचा पल्ला गाठणार आहे. तर 3.2 सेंकदात एकदम सूसाट धावेल.

या इलेक्ट्रिक कारने दिग्गजांना आणला फेस, 3.2 सेंकदातच सूसाट धावणार
भन्नाट इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 2:06 PM

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेझ दिसून येत आहे. EV सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी म्हणून MG Motor समोर आली आहे. एमजी मोटर्सने JSW समूहासोबत संयुक्तपणे कामाची घोषणा पण केली आहे. आता कंपनी JSW MG Motors India या नावाने ओळखल्या जाणार आहे. या संयुक्त उपक्रमाच्या घोषनेनंतर कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्पोर्टकार MG Cyberster ची झलक दाखवली. ही कार एकदा चार्जिंग झाल्यावर 580 किमीचा पल्ला गाठते. तर 3.2 सेंकदात एकदम सूसाट धावण्याचा दावा करण्यात येत आहे.

आता भारतात कार

2021 मध्ये पहिल्यांदा कंपनीने MG Cyberster भारतात दाखल केली होती. त्यानंतर 2023 मध्ये गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये पण कंपनीने ही कार समोर आणली होती.आता कंपनी भारतात पहिल्यांदाच ही कार घेऊन आली आहे. यावर्षाच्या अखेरीस ही कार रस्त्यावरुन धावताना दिसेल.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फीचर्स

  1. या कारची लांबी 4,533 मिमी, रुंदी 1,912 मिमी, उंची 1,328 मिमी आहे. या कारमध्ये 2,689 मिमीचा व्हीलेबस देण्यात आला होता. या कारमध्ये दोन जणांची बसण्याची व्यवस्था आहे. या कारमध्ये 19-20 इंचाचा डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आला आहे. MG Cyberster च्या बॉडीवर स्लीक, कट्स आणि क्रीच दिसतील. त्यामुळे ही कार मनमोहून घेते.

  1. या कारमध्ये वायरलेस ॲप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोची सुविधा मिळते. याशिवाय या इन-बिल्ट 5G सिम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, ड्युअल झोन क्लायमेंट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड, प्रीमियम बोस ऑडियो सिस्टम, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8155 चिप, रीजनरेटिव्ही ब्रेकिंग, मल्टिपल एअरबॅग, लेवल-2 ADAS असे फीचर्स मिळतात.

  1. एमजी सायबरस्टर ही दोन बॅटरी पॅक आणि मोटर पर्यायासह उपलब्ध आहे. बेसिक मॉडेलमध्ये 64 kWh क्षमतेचा बॅटरी पॅकसह सिंगल 308 hp रिअर एक्सल माऊंटेड इलेक्ट्रिक मोटर मिळते. या कारची रेंज 520 किमी असल्याचा दावा करण्यात येतो.

  1. या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह एक मोठी77kWh बॅटरी पॅक पण देण्यात आला आहे. तो 535hp आणि 725Nm पीक टॉर्क जेनरेट करते. हे व्हेरिएंट सिंगल चार्जमध्ये 580 किमीची रेंज देते. ही स्पोर्ट कार अवघ्या 3.2 सेंकदात ताशी 0-100 किमीची रेंज देते.
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.