Bajaj च्या CNG बाईकची संपली प्रतिक्षा, कंपनीने केली घोषणा, प्लॅटिनापेक्षा मिळेल जास्त मायलेज

Bajaj CNG Bike : देशी बाईक कंपनी बजाजने शेवटी देशातील पहिल्या CNG Bikes ची घोषणा केली. ही बाईक केव्हा भारतीय रस्त्यांवरुन धावणार याचा खुलासा कंपनी केला. ही बाईक एक किलो सीएनजीमध्ये 80Km चे मायलेज देणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्थात कंपनीने याविषयीची अधिकृत माहिती दिलेली नाही.

Bajaj च्या CNG बाईकची संपली प्रतिक्षा, कंपनीने केली घोषणा, प्लॅटिनापेक्षा मिळेल जास्त मायलेज
Bajaj CNG बाईक तीन महिन्यात बाजारात
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 5:30 PM

देशी बाईक निर्माता कंपनी Bajaj ने अखेरीस त्यांची बहुप्रतिक्षीत CNG Bike ची घोषणा केली. वृत्ता संस्था पीटीआयने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सीएनजी मोटरसायकल मालिकेविषयी माहिती दिली. अगदी तीन महिन्यात सीएनजी मोटारसायकलचे पहिले मॉडेल मार्केटमध्ये दाखल होत आहे. कंपनीने पुढील 5 वर्षातील व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करतानाच सीएनजी बाईकची माहिती दिल्याचा दावा या संबंधीच्या वृत्तात करण्यात आला आहे.

बाईक या महिन्यात होणार दाखल

बजाज ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी आहे. बाजारात पेट्रोलला पर्याय देण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. कंपनी काही दिवसांपासून CNG Bike ची टेस्टिंग करत आहे. रस्त्यावरील चाचणीसाठी ही दुचाकी बाहेर पडल्याचा दावा एका छायाचित्राच्या आधारे करण्यात आला होता. आता ही बाईक बाजारात कधी दाखल होणार याची प्रतिक्षा होती. या बाईकची घोषणा करण्यात आली आहे. ही बाईक जून 2024 दरम्यान भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सीएनजी बाईकचा पर्याय कशासाठी

CNG Bike बाजारात दाखल होत आहे. इलेक्ट्रिक बाईकबाबत अजून पण भारतीय साशंक आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि ई-बाईक यामधील सीएनजी हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.

काय असेल नवीन बाईकमध्ये

या नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, फ्रंट डिस्क ब्रेक, एलिव्हेटेड हँडलबार, अपराइट राइडिंग पोझिशन,अलॉय व्हील हे पार्ट असतील. पल्सर NS125 चीच ही कॉपी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बाईकमध्ये मोनोशॉक देण्यात आले आहे. वळणदार आणि मोठी फ्युएल टाकी असल्याचे दिसून येते. सध्या या बाईकला एक सिंगल पीस सीट दिलेले दिसते. टायर हगर, इंटिग्रेटेड फूटरेस्टसह साडी गार्ड आणि इंजिन क्रॅश गार्ड यांचा समावेश आहे. एअर-कूल्ड मोटरची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच सर्व डिझाईनवरुन ही बजाजची CNG Bike असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...