250cc गाड्यांना टक्कर देणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

यात्री मोटारसायकल्स या नेपाळी ब्रँडने आपले दुसरे इलेक्ट्रिक उत्पादन बाजारात सादर केलं आहे. प्रोजेक्ट वन असे या प्रकल्पाचे नाव आहे.

250cc गाड्यांना टक्कर देणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट
Yatri Motorcycles Project One
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 11:02 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, एका नेपाळी ओटोमाबाईल कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलने नेपाळसह भारतातील ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Yatri Motorcycles Unveils Project One Electric Dual-Sport Bike)

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक सेगमेंटमध्ये अॅथर आणि बजाज या कंपन्यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, आपल्या शेजारील देश म्हणजे नेपाळमध्ये सध्या प्रवासी मोटारसायकलींचा ओघ सुरु झाला आहे. यात्री मोटारसायकल्स (YATRI Motorcycles) या नेपाळी ब्रँडने आपले दुसरे इलेक्ट्रिक उत्पादन बाजारात सादर केलं आहे. प्रोजेक्ट वन (Porject One) असे या प्रकल्पाचे नाव आहे.

शानदार डिझाईन आणि पॉवर

नेपाळमध्ये या इलेक्ट्रिक उत्पादनाला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या बाईकचं डिझाइन शानदार आहे. या बाईकच्या फ्रंटला आपल्याला एक राउंड एलईडी हेडलाइट मिळेल जी डीआरएलसह येते. त्याच वेळी, प्रोजेक्ट वन (Porject One) ही एक सिंगल-सीटर बाईक आहे. या बाईकच्या आउटपुटबद्दल बोलायचे झाल्यास ही बाईक 14kW पीक पॉवर आणि 480Nm टॉर्क देते, प्रोजेक्ट वन थोडी वजनाने हलकी बाईक आहे.

110 किमीपर्यंतची रेंज

प्रत्येकासाठी ही बाईक परफेक्ट आहे. या गाडीचं वजन केवळ 110 किलो इतकं आहे. ही बाईक चालवणाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही बाईक कोणत्याही 250cc मोटारसायकलला जोरदार टक्कर देऊ शकते. या बाईकचं स्पीड लिमिट 100 किमी प्रति तास इतकं आहे. ही बाईक तुम्हाला सिंगल चार्जवर 110 किमीपर्यंतची रेंज देते

किंमत

YATRI Motorcycles ने अद्याप या बाईकबाबतची अधिक माहिती शेअर केलेली नाही. परंतु या बाईकचे व्हिज्युअल्स पाहून अंदाज येईल की, ही एक दमदार बाईक सिद्ध होईल. या बाईकच्या फ्रंट आणि रियरमध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 3.09 लाख रुपये इतकी आहे. या बाईकचं बुकिंग करण्यासाठी 10,000 रुपये (नेपाळी रुपये) द्यावे लागतील. यात्री मोटरसायकल्सने अद्याप भारतात त्यांचा प्लांट सेटअप केलेला नाही. अशातच तुम्ही ही बाईक आयात करु शकता.

भारतातल्या रस्त्यांवर धावणार

इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या भारतात हळूहळू त्यांच्या प्लांटसह चार्जिंग स्टेशन्स सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये या गाड्यांबाबत कुतूहल पाहायला मिळतंय. त्यामुळे या वर्षाच्या अखेपर्यंत भारतातील रस्त्यांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं पाहायला मिळतील.

इतर बातम्या

Two Wheelers च्या विक्रीत ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स, Splendor आणि Activa चा धुमाकूळ

55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

बजाज पल्सर Dagger Edge एडिशन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Yatri Motorcycles Unveils Project One Electric Dual-Sport Bike)

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.