AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूरसंचार क्षेत्रात क्रांती, 5G नेटवर्किंगसाठी अनुकूल वातावरण

आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. त्यात दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच दूरसंचार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे आता  5G मधील गुंतवणुकीला सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.

दूरसंचार क्षेत्रात क्रांती, 5G नेटवर्किंगसाठी अनुकूल वातावरण
बजेट
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 9:51 PM
Share

आर्थिक सर्वेक्षणानुसार  (Economic Survey 2022) दूरसंचार (Telecom) क्षेत्रात सुधारणा घडून आणण्यासाठी  सरकार विशेष लक्ष देत आहे. जर दूरसंचार क्षेत्र सुधारल्यास 4G नेटवर्कला चालना मिळेल आणि 5G नेटवर्कसाठीही अनुकूल वातावरण तयार होईल. गेल्या दोन वर्षांपासून भारत कोरोना संकटाशी लढा देत आहे.  2021-22 आर्थिक सर्वेक्षणानुसार या दोन वर्षांत ऑनलाईन काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांतील कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. त्यामुळे आजच्या काळात डेटाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. दूरसंचार क्षेत्रात सुधारणा झाल्यास ब्रॉडबँड, दूरसंचार कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन मिळेल. भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचा दावा या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे.  त्यामुळे येणाऱ्या काळात टेलीकॉम क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे

दूरसंचार हे सर्वात शक्तिशाली क्षेत्र

देशाच्या सर्वांगिन विकासाठी दूरसंचार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत दूरसंचार क्षेत्राचं महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कोरोना काळात दूरसंचार ग्राहकांची संख्या, इंटरनेट ग्राहकांची वाढती संख्या आणि ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी झपाट्याने वाढली आहे. यावरुन दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती समजू शकते. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डेटाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासकरुन दूरसंचार क्षेत्रात कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या डेटाला ग्राहकांनी पसंती मिळाली. 2017-18मध्ये वायरलेस डेटा उपभोगाची मागणी प्रति महिना सरासरी 1.24 गीगाबाइट एवढी होती. ती आता 14.1 गीगाबाइट इतकी झाली आहे. तर डिसेंबर 2021पर्यंत मोबाईल टॉवरची संख्या 6.93 लाख इतकी झाली आहे.

नवीन आव्हांनासाठी अर्थव्यवस्था सज्ज

पुढील आर्थिक 2022-23 वर्षात भारताचा विकास दर (GDP) 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणात महागाईचा दर आटोक्यात राहणे अपेक्षित आहे. यापुढे महामारीमुळे कुठलंही आर्थिक संकट येणार नाही, मान्सून सामान्य राहिल आणि कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल 70-75 असतील, या गोष्टींच्या आधारे भारताचा विकास दर जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Budget 2022 – कधी पटलावर येणार अर्थसंकल्प… तारीख, वेळ आणि कुठे पाहता येणार अर्थसंकल्प…जाणून घ्या एका क्लिकवर

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ

Budget 2022: कोरोनामुळे अडचणी वाढल्या, पण सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशात भारत अग्रेसर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.