बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा लवकर पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मे २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा लवकर पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 3:11 PM

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मे २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता म्हणून करण्यात येणार आहे. पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी 86,300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

नागपूर-गोवा महामार्ग असा जाणार

नागपूर-गोवा हा मार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार अशी जोडली जाणार आहेत. या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा जाणार आहे.

तीन कोटी असंघटित कामगार

3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार आहे. माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल. संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी रुपये दिले जातील. स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

असंघटित कामगारांसाठी निधीची घोषणा

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार : महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ यांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार आहेत. त्यामध्ये सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) यांचा समावेश होतो. मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे सुरू करण्यात येतील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.