AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richest Country : 400 की 500, अमेरिका सारखे श्रीमंत होण्यासाठी भारताला लागतील अजून किती वर्षे?

Richest Country : भारताला आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. त्यात गैर काहीच नाही. पण आर्थिक महासत्ता होण्याचा पल्ला गाठण्यासाठी भारताला आणखी किती वर्षे लागू शकतात?

Richest Country : 400 की 500, अमेरिका सारखे श्रीमंत होण्यासाठी भारताला लागतील अजून किती वर्षे?
कधी होणार महासत्ता
| Updated on: Feb 04, 2023 | 8:04 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून आर्थिक महासत्ता होण्याच्या स्वप्नाकडे भारताने आगेकूच सुरु केली आहे. त्यासाठी मोदी सरकारने काही धोरणं आखली आहेत. सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (5th Largest Economy) म्हणून भारताने ध्वज फडकवला आहे. पण प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये शिरकाव करणे सोपे काम नाही. त्यासाठी अर्थातच नियोजन आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास व्हावा लागणार आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या भारताला निर्यातीचे हब व्हावे लागणार आहे. सध्याच्या केंद्र सरकारने भारताला जगातील मोठी आर्थिक महासत्ता (Economic Power) होण्यासाठी 2047 चे लक्ष्य ठेवले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, 2027 पर्यंत आर्थिक आघाडीवर भारत जर्मनी आणि जापानला धोबीपछाड देईल. अमेरिका, चीन नंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. त्यासाठी आता अवघे पाच वर्षे उरली आहेत.

भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतावर कधी काळी 150 वर्षे राज्य गाजविलेल्या ब्रिटेनला भारताने मागे टाकले आहे. पण हा प्रश्न उरतोच की भारताला अमेरिके सारखं श्रीमंत होण्यासाठी, आर्थिक महासत्ता होण्यासाठी अजून किती काळा लागेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याविषयीचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, जपान आणि जर्मनीची अर्थव्यवस्था सध्या 5.2 खरब डॉलर (Trillion Dollar) आणि 4.9 खबर डॉलर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर भारत 2027 पर्यंत 5.4 खरब डॉलरची अर्थव्यवस्था असेल.

मोदी सरकारने केवळ 5 खरब डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहिले आहे. पण आयएफएमच्या आकडेवारीनुसार, भारत हा आकडा मागे टाकेल. पण भारताचे खरे प्रतिस्पर्धी असणारे अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढणार आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था तोपर्यंत 30.28 खरब डॉलर तर चीनची अर्थव्यवस्था 26.44 खरब डॉलरपर्यंत वाढेल.

जपान आणि जर्मनी येत्या पाच वर्षात पिछाडीवर टाकणे भारतासाठी फारसे आव्हानात्मक नाही. हे आव्हान भारत लिलया पेलेल आणि सत्यात पण उतरवेल. पण खरे आव्हान जागतिक अर्थव्यवस्था होण्याचे आहे. जो वेग भारताला हवे, तो गाठण्यासाठी मोठ्या भांडवलाची, उद्योग धंदाची आवश्यकता आहे. भारताकडे कुशल मनुष्य बळाची कमी नाही.

कोरोना महामारीपूर्वी म्हणजे 2014 ते 2019 पर्यंत भारताची डॉलरच्या अनुषंगाने वार्षिक वृद्धी दर जवळपास 6.8% होता. तर अमेरिकेचा हा दर 4 टक्के आणि चीनचा वृद्धी दर 6.4 टक्के होता. जर भारत याच वेगाने धावत राहिला तर जागतिक अर्थव्यवस्था होण्यासाठी त्याला जवळपास 400 वर्षे लागतील.

कोविडनंतर, 2021-22 मध्ये भारताचा विकास दर डॉलरच्या अनुषंगाने कमी झाला. त्यानुसार, भारताला आर्थिक महासत्तेचे लक्ष्य गाठण्यासाठी जवळपास 650 वर्षे लागतील. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6% ते 6.8% या विकास दरासह प्रगती करण्याची शक्यता आहे.

भारताला 2047 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था होण्यासाठी अर्थातच अमुलाग्र बदल करावे लागतील. आर्थिक महासत्ता होण्यासाठी भारताला दर वर्षी 14 टक्के विकास दर गाठावा लागेल. भारतीय जीडीपी सध्या 6.5 ते 7.7 राहिल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.