AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या दिवाळीत चीनला 50 हजार कोटींचे नुकसान! चिनी मालावर बहिष्काराची CAIT ची अपेक्षा

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने देखील अपेक्षा व्यक्ती केली आहे की, ग्राहक दिवाळी सेलच्या कालावधीत सुमारे 2 लाख रुपये खर्च करू शकतात. सीएआयटीने सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सीएआयटीने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून, चीनला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक नुकसान होणार असल्याचे निश्चित आहे.

यंदाच्या दिवाळीत चीनला 50 हजार कोटींचे नुकसान! चिनी मालावर बहिष्काराची CAIT ची अपेक्षा
cait
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 7:33 PM
Share

नवी दिल्लीः Boycott of Chinese Products: व्यापार संघटना CAIT ने केलेल्या बहिष्काराच्या आवाहनामुळे चिनी निर्यातदारांना दिवाळीच्या हंगामात व्यवसायात 50,000 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही सीएआयटी इंडियाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आणि अर्थातच देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून आयात करणे बंद केले, यामुळे दिवाळी सणासुदीच्या काळात चीनमध्ये सुमारे 50 हजार कोटींची व्यापार तूट होणार आहे.

भारतीय व्यापाऱ्यांनी चीनमधून होणारी आयात थांबवावी, CAIT ची अपेक्षा

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने देखील अपेक्षा व्यक्ती केली आहे की, ग्राहक दिवाळी सेलच्या कालावधीत सुमारे 2 लाख रुपये खर्च करू शकतात. सीएआयटीने सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सीएआयटीने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून, चीनला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक नुकसान होणार असल्याचे निश्चित आहे. सीएआयटीचे म्हणणे आहे की, भारतीय व्यापाऱ्यांकडून चिनी वस्तूंची आयात थांबवून हे शक्य होणार आहे.

संस्थेच्या संशोधन शाखेने नुकतेच 20 आर्थिक शहरांमध्ये सर्वेक्षण केले

कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, संस्थेच्या संशोधन शाखेने नुकतेच 20 आर्थिक शहरांमध्ये सर्वेक्षण केले होते. असे दिसून आले आहे की, आतापर्यंत दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी भारतीय व्यापारी किंवा आयातदारांनी चिनी निर्यातदारांना ऑर्डर दिलेली नाही. नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मदुराई, पुद्दुचेरी, भोपाळ आणि जम्मू ही 20 शहरे सर्वेक्षणात समाविष्ट आहेत.

चीन आणि भारत यांच्यात दीर्घकाळापासून वाद

चीन आणि भारत यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत भारत आणि चीनमधील वाद सुरूच आहे.

संबंधित बातम्या

फिनो पेमेंट्स बँक काय करते, आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, जाणून घ्या

एखाद्याच्या मृत्यूनंतर पॅन आणि आधार कार्डचे काय करायचे? जाणून घ्या

50,000 crore loss to China this Diwali! CAIT expects boycott on Chinese goods

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.