एका खासगी वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयामुळे 8 लाख बँकर्स आणि सपोर्टिंग स्टाफच्या पगारात वाढ होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारात नोव्हेंबरपासून वाढ होणार आहे. म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला येणारा पगार वाढणार आहे.
Follow us
नवी दिल्लीः केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट मिळालंय. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली ही वाढ आजमितीस सुरूच आहे. सरकार वेळोवेळी त्यांच्या कर्मचार्यांसाठी DA, DR आणि पगार वाढवण्याची घोषणा करते. काही महिन्यांपूर्वीची वाढ जोडून ही वाढ प्रभावी करण्यात आलीय, त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही थकबाकीचा लाभ मिळू लागलाय.