8th pay commission : जेवढं पेमेंट लेट, तेवढा जबरदस्त फायदा… एकसाथ मिळतील 600000 रुपये; आताच चेक करा
8th Pay Commission Arrears Calculation: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांच्या आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे. वेतन आयोग आपल्या शिफारसी जितक्या उशिरा सादर करेल तितका कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांच्या आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे. आठवा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असणार आहे जी स्थापनेपासून 18 महिन्यांच्या आत सरकारकडे शिफारसी सादर करणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन 1 जानेवारी 2026 पासून वाढण्याची शक्यता आहे. मात्र वेतन आयोग आपल्या शिफारसी जितक्या उशिरा सादर करेल तितका कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले
वेतन आयोगाने शिफारसी सादर करण्यास विलंब केल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. कारण सरकारला कर्मचाऱ्यांना मासिक थकबाकी द्यावी लागणार आहे. जर आयोगाने एप्रिलमध्ये शिफारसी सादर केल्या आणि सरकारने मे महिन्यापासून वाढीव वेतन देण्यास सुरुवात केली तर कर्मचाऱ्यांना फक्त एका महिन्याचा वाढलेला पगार मिळणार नाही, तर जानेवारीपासून वाढीव थकलेला पगार मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. हे एका उदाहरणाऱ्या माध्यमातून समजून घेऊयात.
थकीत वाढीव पगार मिळणार
सरकारने जर जुलै महिन्यापासून वाढीव वेतन द्यायला सुरुवात केली तर कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून थकीत पगार मिळेल. 2.47 % फिटमेंट फॅक्टरने पगारवाढ झाली तर मूळ पगार 18000 वरून 44460 रूपये होईल. तसेच मूळ पगाराच्या 30 % घरभाडे भत्ता मिळेल. म्हणजे एका महिन्याच्या पगारात तुम्हाला 37798 रूपये वाढन मिळतील. पण जानेवारी ते जून पर्यंतचेही तुम्हाला पैसे मिळतील. सहा महिन्यांत 226788 रुपये थकतील. तसेच जुलैमध्ये तुम्हाला वाढलेला पगार 57798 रुपये मिळेल. ही रक्कम आणि थकीत रक्कम एकत्र केली तर जुलैमध्ये तुमच्या खात्यात 284586 रुपये जमा होतील. मुळ पगार जितका जास्त असेल तितका जास्त पगार कर्मचाऱ्यांना मिळेल.
शिफारसी लांबल्यास जास्त पगार मिळणार
महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने शिफारस करण्यासाठी मिळालेले पूर्ण 18 महिन्यांचा कालावधी घेतला तर कर्मचाऱ्यांना 16 महिन्यांची थकबाकी मिळेल. त्यावेळी किमान वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला एकाच वेळी 6 लाख रुपये मिळतील. मात्र आयोगाने शिफारस डिसेंबरमध्ये सादर केली तर कर्मचाऱ्याला कोणतीही थकीत रक्क्म मिळणार नाही. सर्वात कमी मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला फक्त 57798 रुपये मिळतील.
