अभय भुतडा – परिवर्तन विशेषज्ञ

डिजीटल स्वरुपात कर्ज उपलब्धतेमुळे जगभर वित्तीय सेवा सुरू झाल्या. भारतात, अगदी आजही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. प्रत्येक कर्जदार व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी पूनावाला फिनकॉर्पच्या ध्येयाशी हे सुसंगत आहे.

अभय भुतडा – परिवर्तन विशेषज्ञ
Abhay BhutadaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 11:07 AM

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : अभय भुतडा हे पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असून त्यांचा विश्वास आर्थिक समावेशकतेवर आहे. तसेच त्यांनी तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनचा वापर करून कर्ज देणे अधिक सुलभ करण्याच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ, हेराक्लिटस हा त्याच्या ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट’ या सुप्रसिद्ध वाक्यासाठी ओळखला जातो आणि अभय भुतडा यांनी बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रात असाच बदल घडवून आणणाऱ्या प्रमुख आघाडीच्या उमेदवारांपैकी एक आहेत. जून २०२१ मध्ये मॅग्मा फिनकॉर्पचे यशस्वी अधिग्रहण केल्यानंतर त्यांनी पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL)चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांच्यासारखे गतिशील नेतृत्व लाभल्याने कंपनीने मागे वळून पाहिलेच नाही. मॅग्मा फिनकॉर्प हे पारंपरिक उत्पादने, प्रक्रिया आणि प्रणालींसह तीन दशके जुने बँकिंगएतर वित्तीय महामंडळ (NBFC) होते आणि संपादनानंतर श्री. भुतडा यांनी त्यात अनेक डिजीटल बदल घडवून आणले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व्यवसाय नवीन अवतारात यशस्वीरित्या उदयाला आला.

प्रारंभिक बँकिंग कारकिर्द आणि उद्योजकीय प्रवास

अभय हे स्वत: चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून कर्ज देणे ही संकल्पना त्यांच्याहून अधिक चांगल्यारितीने कोणाला समजणार! “प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते. प्रत्येक अपयश ही एक पायरी असते आणि प्रत्येक मापदंड ही आत्मपरीक्षण करण्यासोबतच सुधारणा करण्याची संधी असते” यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचा दूरदर्शीपणा आणि निर्दोष अंमलबजावणीने अनेक मान-सन्मान आणि पुरस्काराचे ते मानकरी ठरले. ‘ग्लोबल इंडियन ऑफ द इयर’ २०२३, ‘द यंग आंत्रप्रेन्योर ऑफ इंडिया’, २०१७, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, द इकॉनॉमिक टाइम्स ‘प्रॉमिसिंग आंत्रप्रेन्योर ऑफ इंडिया’, २०१९, आशिया वनच्या ‘फोर्टी अंडर फोर्टी मोस्ट इन्फ्लुएंशियल लीडर फॉर २०२० -२१’ असे सन्मान त्यांना लाभले.

अभय यांनी २०१० मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये SME फायनान्स प्रोफेशनल म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. पुढे त्यांचा प्रवेश बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रात झाला. मारवाडी व्यावसायिक कुटुंबातून आलेल्या अभय यांच्या रक्तातच उद्योजकीय मानसिकता आणि व्यावसायिक कौशल्य होते. त्यामुळे त्यांनी बँकेला राम-राम केल्यानंतर लागलीच स्वतःची वित्तविषयक सल्लागार कंपनी सुरू केली. भारताच्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा म्हणजेच बीएफएसआय क्षेत्रात गोष्टी वेगाने बदलत असताना, महत्त्वाकांक्षा असलेले लोक स्मार्ट आणि नवीन युगात डिजीटली तज्ज्ञ व्यक्तीच्या शोधात असताना अभय यांना योग्य संधी दिसली. तेव्हा अभय यांनी २०१६ दरम्यान एनबीएफसी – टॅब कॅपिटल’ची स्थापना केली. यानंतर अभय प्रगतीपथावर सुसाट झाले. त्यांचा भर कायमच डिजीटल लेंडिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यावर राहिला. कर्जसंबंधी अर्ज आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे नवीन स्तरावर नेण्यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता. त्यांनी टॅब कॅपिटल’च्या माध्यमातून एमएसएमई वित्तपुरवठ्यासाठी अशा प्रकारचा पहिला डिजीटल प्लॅटफॉर्म यशस्वीरित्या तयार केला. या माध्यमातून ग्राहकांचा कर्ज प्रवास सुरळीत करण्याच्या दिशेने मोठा हातभार लागला.

अभय यांच्या नेतृत्वाखाली, डिजीटल कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकिंगएतर वित्तीय महामंडळ (NBFC) ने तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून, संपूर्ण वितरण प्रक्रिया दोन कार्यालयीन दिवसांत पूर्ण करून जवळपास २ लाख ते १ कोटी दरम्यान असुरक्षित एमएसएमई कर्ज उपलब्ध करून दिली.

श्री. अदार पूनावाला यांच्यासमवेत हातमिळवणी

टॅब कॅपिटलच्या यशानंतर, डिजीटल कर्ज उपलब्धता क्षेत्रात काहीतरी भरीव योगदान देण्याची खटपट अभय यांनी सुरू केली. दरम्यानच्या काळात त्यांनी श्री. अदार पूनावाला यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. अभय यांनी २०१९ मध्ये स्वत:ची एनबीएफसी टॅब कॅपिटलचे विलीनीकरण पूनावाला फायनान्समध्ये केले. या नव्याने उभारलेल्या संस्थेसह, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक म्हणून अभय यांनी पूनावाला समूहासाठी कर्ज व्यवसायाची स्थापना करण्यात अविभाज्य भूमिका बजावली. या भागीदारीतून सुमारे ८.४ अब्ज डॉलर्सच्या सायरस पूनावाला समूहाचे कर्ज पुरवठा क्षेत्रात पदार्पण झाले. या एकूणच प्रवासात अभय यांनी रक्कम कर्जाऊ स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी डिजीटल-प्राधान्य दृष्टिकोन (डिजीटल-फर्स्ट अप्रोच) विकसीत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कामकाजाच्या पहिल्याच वर्षात नफा नोंदवला. या यशाला AA+ दर्जा देखील देण्यात आला. कंपनीने अल्पावधीतच तब्बल १,००० कोटी रुपयांचा असेट अंडर मॅनेजमेंट (AUM)चा टप्पा देखील पार केला.

पूनावाला फायनान्सने जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त ३० लाख रुपयांचे तारण-मुक्त कर्ज देऊ केले. कंपनीची महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपस्थिती होती. आपल्या अंतीम ग्राहकापर्यंत पोहोचणाऱ्या एंड-टू-एंड डिजिटाइज्ड फायनान्सिंग मॉडेलद्वारे, कंपनीने सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पतपुरवठ्याची तफावत भरून काढली आणि व्यवसाय विस्तार आणि कार्यरत भांडवलाच्या आवश्यकतांसाठी ग्राहक-गरजेनुरूप लघु स्वरुपातील कर्ज म्हणजे स्मॉल-तिकीट लोन देऊ केले.

मॅग्मा फिनकॉर्प’चे संपादन

आपले उद्योजकता कौशल्य टॅब कॅपिटल आणि पूनावाला फायनान्सबरोबर यशस्वीरित्या आजमावल्यानंतर, आर्थिक समावेशकता आणि शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अजूनही प्रचंड क्षमता असल्याचे अभय यांचे मत होते. टियर-२ आणि टियर-३ बाजारपेठेतील अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, कर्ज मागणीला चालना देण्याची महत्त्वाकांक्षा होती, एक अखिल भारतीय कंपनी निर्माण करणे काळाला धरून ठरले असते. अशास्थितीत कोलकाता येथील एनबीएफसी मॅग्मा फिनकॉर्प विकत घेण्यासाठी पाऊल उचलणे सुसंगत होते. अभय यांना काळाची पावले ओळखण्याची हातोटी असल्याने व्यवसाय वाढीसाठी भविष्यातील सुसंधी हेरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सन २०२१ च्या पूर्वार्धात अखिल भारतीय ३२ वर्षीय एनबीएफसी, मॅग्मा फिनकॉर्प विकत घेण्यासाठी श्री. अदार पूनावाला यांच्यासोबत अभय यांनी हातमिळवणी केली. कालांतराने जुलै २०२१ मध्ये पूनावाला फिनकॉर्प असे नामकरण करण्यात आले.

यशस्वी अधिग्रहणानंतर, अभय यांनी नवीन संस्थेत व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळले आणि पूनावाला फिनकॉर्प ही सर्वात विश्वासार्ह वित्तीय सेवा नाममुद्रा (ब्रँड) म्हणून स्थापित केली. त्यांचे दूरदर्शी आणि प्रेरणादायी नेतृत्व, सोबतच तीक्ष्ण व्यावसायिक कौशल्ये आणि डिजीटायझेशन-स्नेही दृष्टिकोनामुळे पूनावाला फिनकॉर्पचे यशस्वीरित्या परिवर्तन झाले. कंपनीने नफा कमावण्यास सुरुवात केली आणि उत्कृष्ट वित्तीय निकाल दिले.

पूनावाला फिनकॉर्पचे ध्येय व्यक्तींची सेवा करणे आणि लहान व्यवसायांना स्वप्नं बघण्यात सक्षम करण्यासाठी श्रेणीतील सर्वोत्तम ग्राहक-केंद्रित उत्पादने आणि उपाय उपलब्ध करून अधिक यश साध्य करण्यात मदत करण्याचे होते. कंपनीने आपले नाव केवळ मॅग्मा वरून पूनावाला असे बदलले नाही तर व्यवसायाची मूलभूत पद्धत देखील बदलली. अधिग्रहण प्रक्रिया आणि नामांतर पूर्ण झाल्यावर, कंपनीने मोठ्या प्रमाणात शहरातील श्रीमंत ग्राहकांना सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करून ग्राहक आणि एमएसएमई कर्ज यांसारखी अनेक नवीन उत्पादने सादर करून उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सुधारणा केली.

संपादनापूर्वीची स्थिती- सुधारित कामगिरी , डिजीटल प्रवास आणि मूलभूत बदल

कंपनी संपादनानंतर,अभय यांच्या अंगभूत नेतृत्वाखाली पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) ने दूरदृष्टी ठेवून मांडलेल्या  कल्पनांवर काम केले आणि  व्हिजन २०२५ च्या दृष्टीने ठोस प्रणाली आणि प्रक्रियांची अंमलबजावणी केली. परिणामी, व्यवसायाचा चेहरा-मोहराच बदलून गेला.  “डिजिटल युगातील व्यवसायाची नव्याने-कल्पना” करून कंपनीने यशस्वीरीत्या पारंपरिक कर्जदाता ही ओळख पुसून सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटलदृष्ट्या सक्षम एनबीएफसी होण्याचा  प्रवास पूर्ण केला. पूनावाला फिनकॉर्पने तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषण क्षेत्रात महत्त्वाची गुंतवणूक केली आणि सर्वोत्कृष्ट ग्राहक केंद्रित उत्पादने आणि उपाययोजना देण्यास सुरुवात केली.

त्यांच्या नेतृत्वाखाली,  नव्या पूनावाला फिनकॉर्प संस्थेला क्रिसिल आणि केअर (सीएआरई) कडून २०२२ दरम्यान (केअरतर्फे मॅग्माच्या AA श्रेणीनुसार ३ नॉचेस सुधारित)   ‘AAA’  चे बाह्य क्रेडीट मानांकन मिळाले.  पूनावाला फिनकॉर्पचे सध्याचे मूल्यांकन हे ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.  सप्टेंबर २०२२ मध्ये निफ्टी मिडकॅप सूचीमध्ये आणि जुलै २०२३ मध्ये निफ्टी फायनान्शियल सर्विसेस (एक्स-बँक) तसेच फेब्रुवारी २०२४ दरम्यान एफटीएसईमध्ये याचा समावेश करण्यात  (केअरतर्फे मॅग्माच्या एए श्रेणीनुसार ३ नॉचेस सुधारित)  ‘AAA’  चे बाह्य क्रेडीट मानांकन मिळाले.  बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राच्या इतिहातील सर्वात वेगवान अनपेक्षित बदलांपैकी हा एक बदल आहे, यात काही शंका नाही.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २४ च्या तिमाहीत, वर्षागणिक ७६% ची उसळी मारून २६५ कोटी रुपयांचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा (PAT) कमावला असल्याचे जाहीर केले आहे.  कंपनीच्या असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) अंतर्गत २१,९४६ कोटी रुपयांची झालेली वाढ ही वर्षागणिक ५८% विकास आणि ९% तिमाही ते तिमाही वाढ दर्शवते. कंपनीने आत्तापर्यंतचे सर्वाधिक तिमाही वितरण करून ८,७३१कोटी रुपयांचा पल्ला गाठला गाठला आहे. यात १५९% वर्षागणिक विकास आणि १२% तिमाही ते तिमाही वाढीचा समावेश आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे (PFL)ने आर्थिक वर्ष २१ AUM च्या २.१x  AUM प्राप्त केले होते आणि वर नमूद केलेला ३x (तीन पट) पल्ला वेळेपूर्वीच गाठण्याच्या ती मार्गावर आहे.

‘पी’ म्हणजे पॅशन अर्थात तळमळ, प्रिन्सिपल्स अर्थात तत्त्वे, पर्पज अर्थात उद्दिष्टे, पीपल अर्थात लोक आणि पॉसिबिलीटीज अर्थात शक्यता ही  पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL)ची नवीन ओळख आहे. १९ राज्यांमध्ये विस्तृतरीत्या कार्यरत असणाऱ्या या कंपनीत २,३००पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. कंपनीच्या आर्थिक सेवामध्ये आधीपासून असलेल्या कार मालकीसाठी अर्थसहाय्य, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिकांसाठी कर्ज,  मालमत्तेच्या बदल्यात कर्ज,  पुरवठा साखळी अर्थसहाय्य, यंत्रसामुग्री कर्ज, वैद्यकीय उपकरणांसाठी कर्ज आणि ग्राहक कर्जाचा समावेश आहे.

सर्वोत्तम मालमत्तेच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून  ठोस जोखीम व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) वचनबद्ध आहे. उत्पादनांवरील प्रस्ताव/ऑफर्सचा विचार करताना ‘निवडलेल्या’ आणि ‘पत-चाचणी’ केलेल्या ग्राहकांपर्यंतपोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये उत्कृष्ट सिबिल स्कोअर असलेल्या विश्वासार्ह ग्राहकांवर संपूर्ण लक्ष असते आणि कर्जबुडीची जोखीम कमी केली जाते. बाजारात वेगळेपणा निर्माण करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ग्राहकांचा आनंद वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL)चा ठाम विश्वास आहे. उच्च दर्जाचे ग्राहक प्रोफाइल, विवेकपूर्ण हमीपत्र आणि संकलन क्षमतेसह पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) महानगर आणि शहरी क्षेत्रावर केंद्रित पोर्टफोलिओ तयार करून पोर्टफोलिओची गुणवत्ता वाढवणारे परिणाम मिळवते आहे.

अभय हे स्वत:च्या अद्वितीय दृष्टिकोनासह आणि जनतेला सहज मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ग्राहक आनंद आणि अनुभवाची हमी घेऊन अखंड आणि विनात्रास ग्राहक कर्ज, सोप्या कर्ज उत्पादनांची निर्मिती देऊ करतात. कोणतेही छुपे शुल्क किंवा अधिकचा खर्च नसलेला, श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मान्यता दर आणि TAT सर्वाधिक आकर्षक किंमत ठेवून त्यांनी त्यांच्या सर्व उत्पादन प्रस्तावांमध्ये संपूर्णपणे पारदर्शकता ठेवली आहे. या अनोख्या संयोगामुळे आणि दूरदृष्टीमुळे आव्हानात्मक काळात स्पर्धेमध्ये पुढे राहण्यास मदत मिळाली आणि आर्थिक व्यवहारांची गर्दी असलेल्या क्षेत्रात त्यांना व कंपनीला स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पाठबळ लाभले.

निष्कर्ष असा की…

डिजीटल स्वरुपात कर्ज उपलब्धतेमुळे जगभर वित्तीय सेवा सुरू झाल्या. भारतात, अगदी आजही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. प्रत्येक कर्जदार व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी पूनावाला फिनकॉर्पच्या ध्येयाशी हे सुसंगत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेवटच्या टप्प्यापर्यंत संपर्काद्वारे आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी हे आरबीआयच्या वित्तीय समावेशन निर्देशांकाच्या अनुषंगाने आहे.

अभय यांच्या चतुर नेतृत्वाखाली, पूनावाला फिनकॉर्प आपल्या घोषित दृष्टिकोनाच्या मार्गावर आहे. उद्योगातील सर्वात कमी सीओएफवर निधी उभारण्यास सक्षम आहे आणि नेट एनपीए <१% सह श्रेणीतील सर्वोत्तम असेट क्वालिटी ठरते आहे. नजीकच्या भविष्यात, कंपनी जोखीम पेलत वेगवान घोडदौड, ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन, आपल्या लोकांसाठी वृद्धी-केंद्रित वातावरण तसेच आपल्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल.

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.