Air India Data leaks: एअर इंडियाने जाणीवपूर्वक डेटा लीक केला, प्रवाशाकडून 30 लाखांच्या भरपाईची मागणी

Air India | ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. मात्र, एअर इंडियाने आपल्याला याविषयी 1 जून रोजी माहिती दिली. हे नियमाचे उल्लंघन असून त्याची भरपाई म्हणून 30 लाख रुपये द्यावेत, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Air India Data leaks: एअर इंडियाने जाणीवपूर्वक डेटा लीक केला, प्रवाशाकडून 30 लाखांच्या भरपाईची मागणी
एअर इंडिया डेटा लीक
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 10:41 AM

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या ग्राहकांची गोपनीय माहिती लीक झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी एका महिला प्रवाशाने एअर इंडियाकडून 30 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सायबर हल्ल्यात एअर इंडियाच्या (Air India) 45 लाख प्रवाशांची माहिती बाहेर गेली होती. यामध्ये रितिका हांडू आणि त्यांच्या पतीच्या गोपनीय माहितीचा समावेश होता. त्यामुळे आता रितिका हांडू यांच्या वकिलांनी एअर इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Air India data leak passanger demands 30 lakh penalty amount)

ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. मात्र, एअर इंडियाने आपल्याला याविषयी 1 जून रोजी माहिती दिली. हे नियमाचे उल्लंघन असून त्याची भरपाई म्हणून 30 लाख रुपये द्यावेत, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मे 2021 मध्ये एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला होता. या सायबर हल्ल्यात प्रवाशांचे वैयक्तिक तपशीलही चोरीस गेले होते. त्यामध्ये क्रेडिट कार्ड, पासपोर्टसह इतर माहितीचा समावेश आहे. एअर इंडिया कंपनीच्या डेटा सेंटरवर झालेला हा सायबर हल्ला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. मात्र, त्याविषयीची माहिती मे महिन्यात उघड करण्यात आली.

या सायबर हल्ल्यात अनेक प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे. यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे. यात जन्म तारीख, नाव, संपर्क, पासपोर्टची माहिती, तिकिटाची माहिती, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधी माहितीचा समावेश आहे, असे एअर इंडियाने सांगितले होते.

‘SITA PSS द्वारे डेटाची चोरी’

हा डेटा SITA PSS द्वारे चोरी झाला आहे. हा डेटा प्रोसेसर प्रवाशांच्या सेवेसाठी काम करतो. तसेच प्रवाशांचा डेटा साठवून ठेवण्याची आणि तो प्रोसेस करण्याची जबाबदारी त्यावर असते. डेटा लीक प्रकरणात कोणत्याही प्रवाशाच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाली आहे. मात्र यात CVV नंबरच्या डेटाची चोरी झालेली नाही. हा सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्याची सुरक्षितता वाढवण्यात आली होती.

या सायबर हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने चौकशी केली आहे. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेले सर्व्हर सुरक्षित करण्यात आले आहे. त्याशिवाय विविध क्रेडिट कार्डधारकांशी याबाबत संपर्क साधला असून त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच एअर इंडियाने एफएफपी प्रोग्रामसाठी वापरला जाणार पासवर्ड रिसेट करण्यात आला होता.

(Air India data leak passanger demands 30 lakh penalty amount)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.