एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूहाची सर्वात मोठी बोली, आता अमित शाह अंतिम निर्णय घेणार

Air India | एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे.

एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूहाची सर्वात मोठी बोली, आता अमित शाह अंतिम निर्णय घेणार
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 11:03 AM

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील समिती एअर इंडियाच्या खरेदीसाठी आलेल्या प्रस्तावांचा विचार करुन लवकरच निर्णय घेईल. यामध्ये टाटा समूहाकडून एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत आहेत. एअर इंडियासाठी निर्धारित करण्यात राखीव किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्यापेक्षा जास्त किमतीवर लावली जाणारी बोली यशस्वी ठरेल. सल्लागार संस्थांकडून यशस्वी बोलीविषयी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्यावर, त्यांच्याकडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविली जाईल.

टाटा 67 वर्षांनंतर एअर इंडियामध्ये परतणार

जर टाटाची बोली यशस्वी झाली, तर टाटा 67 वर्षानंतर एअर इंडियाला परततील. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नंतर एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.

टाटा सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत विस्तारा ही प्रीमियम विमान कंपनी चालवते. टाटा समूहाने स्वतःहून किंवा बजेट एअरलाइन्स एअर एशिया इंडियाद्वारे बोली लावली आहे की नाही हे अद्याप माहीत नाही. एअर एशिया इंडिया टाटा सन्स आणि मलेशियाची एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसाठी एक संयुक्त उपक्रम आहे.

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरू

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.

एअर इंडिया 2007 पासून तोट्यात

2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

संबंधित बातम्या:

67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली

कर्मचाऱ्यांकडूनच ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी; एक-एक लाख रुपयांची वर्गणी

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.