1,000 रुपयांची कोणत्या ठिकाणी सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला अशा काही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा 1000 रुपयांच्या बचतीसह सहज गुंतवणूक करू शकता.

तुम्ही नवीन वर्षानिर्मित्त गुंतवणूक करण्याचा संकल्प केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा 1000 रुपयांच्या बचतीसह सहज गुंतवणूक करू शकता. हो. तुम्हाला काहीही करायचे नाही, फक्त एक चांगला प्लॅन आखायला आणि खर्च थोडा कमी करायचा आहे, या नियमांचे पालन केल्यास तुम्ही देखील चांगली गुंतवणूक करू शकतात.
प्रत्येक व्यक्तीसाठी पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यक्तीने आपल्या मासिक उत्पन्नाचा काही भाग वाचवला पाहिजे आणि चांगल्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्हीही प्रत्येक महिन्याच्या गुंतवणुकीसाठी असा पर्याय शोधत असाल, जिथे तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा 1000 रुपयांच्या बचतीसह सहज गुंतवणूक करू शकता. चला जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस आरडी योजना
पोस्ट ऑफिसच्या आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये लोक दरमहा आपले पैसे गुंतवू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात. या योजनेत 6.7 टक्के व्याज देण्यात आले आहे. त्याच वेळी, योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, त्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम प्राप्त होते. या योजनेत महिन्याला केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक सरकारी योजना आहे, जिथे तुम्ही छोट्या बचतीतून चांगला फंड कमवू शकता. या योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक दरवर्षी करावी लागते. या योजनेत 7.1 टक्के परतावा दर आहे. दरमहा 1000 रुपयांची बचत करून तुम्ही या योजनेत वार्षिक 12,000 रुपये गुंतवू शकता.
म्युच्युअल फंड SIP
दर महिन्याला थोडी बचत करून तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात खूप चांगला फंड कमवू शकता. म्युच्युअल फंड SIP ला सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळतो. तथापि, हा परतावा बाजारानुसार वर किंवा खाली असू शकतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
