AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल अंबानींची रिलायन्स ग्रुप कंपनी Authum खरेदी करणार, RCFLची मान्यता

लेंडर्सने स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे कंपनी घेण्यास यशस्वी निविदाकार म्हणून ऑथम इन्व्हेस्टमेंटची निवड केली. लेंडर्स आणि निविदा करणारे यांच्यात अनेक फेऱ्यांनंतर चर्चा पूर्ण झाली.

अनिल अंबानींची रिलायन्स ग्रुप कंपनी Authum खरेदी करणार, RCFLची मान्यता
अनिल अंबानींना मोठा झटका
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 5:46 PM
Share

नवी दिल्लीः रिलायन्स कमर्शियल फायनान्सने (RCFL) कंपनीच्या रिझोल्यूशन आराखड्यास मान्यता दिलीय आणि Authum इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Authum Investment and Infrastructure) ला यशस्वी बोली लावण्यासाठी निवडलेय. रिलायन्स कॅपिटलने सोमवारी ही माहिती दिली. Authumने सुमारे 1,600 कोटी रुपयांमध्ये RCFLचं अधिग्रहण करणे अपेक्षित आहे. RCFL ही रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, कर्जबाजारी अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची ही कंपनी आहे. रिलायन्स कॅपिटलने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, लेंडर्सने स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे कंपनी घेण्यास यशस्वी निविदाकार म्हणून ऑथम इन्व्हेस्टमेंटची निवड केली. लेंडर्स आणि निविदा करणारे यांच्यात अनेक फेऱ्यांनंतर चर्चा पूर्ण झाली.

कर्जात 9000 कोटी रुपयांची कपात होणार

या कराराच्या परिणामी रिलायन्स कॅपिटलचे एकूण कर्ज 9,000 कोटींपेक्षा खाली येईल. आरसीएफएलमध्ये प्रॉपर्टी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, एमएसएमई/एसएमई लोन, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग, एज्युकेशन लोन आणि मायक्रो फायनान्सिंग यासह अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.

लिस्टेड कंपनी आहे Authum

Authum ही एक सूचीबद्ध कंपनी असून, देशांतर्गत बिगर-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी सुमारे 15 वर्षांपासून कार्यरत आहे आणि 30 जून 2021 रोजी त्याची एकूण संपत्ती 2,360 कोटी रुपये होती. Authum सध्या घरगुती, सार्वजनिक आणि खासगी इक्विटीमध्ये लक्षणीय गुंतवणुकीचा अनुभव असणार्‍या व्यावसायिकांच्या टीमद्वारे व्यवस्थापित केला जातो.

भू संपत्ती गुंतवणूक आणि कर्ज गुंतवणुकीसाठी ही फायदेशीर

सूचीबद्ध कंपन्यांमधील गुंतवणुकीद्वारे Authumची गुंतवणूक धोरण ही दीर्घ मुदतीची मूल्यनिर्मितीसाठी आहे, नॉन-लिस्टेड कंपन्यांना वाढीचे भांडवल उपलब्ध करून देणे, आर्थिक मालमत्ता संपादन करणे, भू संपत्ती गुंतवणूक आणि कर्ज गुंतवणुकीसाठी ही फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त रिलायन्स कमर्शियल फायनान्सच्या प्रस्तावित अधिग्रहणामुळे कंपनीचा व्यवसाय पोर्टफोलिओ मजबूत होईल. हे एनबीएफसी क्षेत्राला एकाधिक वित्तीय उत्पादने आणि सेवांमध्ये एक व्यासपीठ विकसित करण्यास सक्षम करेल.

संबंधित बातम्या

आता पैसे काढणे महागणार, ATMमधून पैसे काढणे शुल्क, डेबिट, क्रेडिट कार्ड शुल्कात वाढ, जाणून घ्या…

शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टीत 1 टक्क्यापेक्षा जास्त घसरण, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 3.34 टक्क्यांनी घसरले

Autham will buy Anil Ambani’s Reliance Group

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.