ऑगस्ट महिन्यात 10 दिवस बँका बंद

यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे.

ऑगस्ट महिन्यात 10 दिवस बँका बंद
आतापर्यंतच शासकीय कामकाजाची वेळ ही 10 ते 5 होती. मात्र आता बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजता उघडणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी बँकांशी निगडीत काम पूर्ण करु शकता.
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 5:36 PM

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकांची कामे रखडणार आहेत. नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशातील बँका तब्बल 10 दिवस बंद राहणार आहेत. या यादीत आरबीआयने कोणत्या राज्यात किती दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात जवळपास 8 दिवस देशातील अनेक बँका बंद राहणार आहे. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर बँकाच्या सुट्ट्यांची माहिती देण्यात आली आहे.

यात 12 ऑगस्ट – बकरी ईद, 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन या दोन दिवस देशातील सर्वच बँकांना अधिकृतरित्या सुट्टी आहे. त्याशिवाय ऑगस्ट महिन्यात 4, 11,18 आणि 25 या दिवशी रविवार आहे. या चारही दिवशी नेहमीप्रमाणे बँकांना सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 10 आणि 24 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहे. यानुसार 8 दिवस देशातील सर्वच बँकांना सुट्टी असणार आहे.

याशिवाय 17 ऑगस्टला पारसी नूतनवर्ष असल्याने मुंबईत बँकेतील काम बंद राहिल. तसेच मंगळवारी 20 ऑगस्टला श्री श्री माधव देव तिथी असल्याने आसाममध्ये बँका बंद राहतील. तर दुसरीकडे उद्या 3 ऑगस्टला हरियाली तीज हा सण साजरा होणार आहे. हा सण प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगढ या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या राज्यातील बँका बंद राहणार आहेत.

तसेच दुसरीकडे 23 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती असल्याने राज्यात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहे. त्याशिवाय 31 ऑगस्टला गुरु ग्रंथ साहिबा जी यांचा प्रकाश उत्सव आहे. हा उत्सव पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या राज्यात 31 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.