AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती, Application फि पासून वयोमर्यादा, सर्व डिटेल्स

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती निघाली आहे. कुठल्या पदांसाठी ही भरती आहे? कुठल्या वयापर्यंतचा उमेदवार अर्ज करु शकतो? Application फी पोटी किती रक्कम भरावी लागणार? परीक्षा कशी होणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती, Application फि पासून वयोमर्यादा, सर्व डिटेल्स
bank recruitmentImage Credit source: getty images
| Updated on: Feb 20, 2025 | 10:54 AM
Share

ग्रॅज्युएट झालेल्या तरुण-तरुणींसाठी एक चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने अपरेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मार्चपासून सुरु होईल. इच्छुक तरुण-तरुणी या पदांसाठी बँकेची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. बँकेने अपरेंटिसच्या एकूण 4 हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अपरेटिंसची ही पदे देशाच्या विभिन्न राज्यात भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्यात 15 ते 20 हजार रुपयादरम्यान स्टायपेड मिळेल. कोणत्या वयापर्यंतचे ग्रॅज्युएट उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात आणि त्यांची निवड कशी होईल? ते जाणून घेऊया.

बँक ऑफ बडोदात अपरेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठातील ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे. उमेदवाराला स्थानिक भाषेची माहिती असली पाहिजे. उमेदवाराचे वय 20 ते 28 दरम्यान असलं पाहिजे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलीय.

अर्ज करताना किती पैसे भरावे लागतील?

जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या अर्जदारांना 800 रुपये एप्लीकेशन फी भरावी लागेल. एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवाराला 600 रुपये आणि दिव्यांग अर्जदारांसाठी 400 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. सर्व श्रेणीच्या अर्जदारांना जीएसटी शुल्क सुद्धा भरावं लागेल.

Bank of Baroda ची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.

होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबमध्ये क्लिक करा.

आता Current Opportunities टॅब वर क्लिक करा.

अपरेंटिस अप्लायसाठी लिंक वर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा.

डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि फी जमा करुन सबमिट करा.

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 Selection Process: कसं होणार सिलेक्शन?

अपरेंटिस पदासाठी अर्जदाराची निवड सीबीटी परीक्षा, भाषा टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशनमधून होईल. परीक्षेत सामान्य आणि आर्थिक जागरुकता, संगणक ज्ञान आणि सामान्य इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकांकडून जारी करण्यात येणाऱ्या वॅकेन्सी नोटिफिकेशन चेक करु शकतात.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.