AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करता, अकाऊंटमधून पैसे गायब होण्याचा धोका, BOI चा इशारा

ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. Bank of India issue Alert

तुम्ही सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करता, अकाऊंटमधून पैसे गायब होण्याचा धोका, BOI चा इशारा
जर आपले बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी करा हे काम
| Updated on: May 04, 2021 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली: ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना बँक खाते, वैयक्तिक माहिती, पिन यासह इतर गोष्टी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु नका, असं कळवलं आहे. एखाद्या ग्राहकांनं त्याची माहिती सोशल साईटसवर शेअर केल्यास त्याला नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. (Bank of India issue Alert to its customer beware of the sharing details on social Media Platforms)

बँक ऑफ इंडियाचं नेमकं आवाहन काय?

बँक ऑफ इंडियानं ट्विट करत ग्राहकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती बँकांच्या टोल फ्री क्रमांकासारखे क्रमांक बनवून ग्राहकांची फसवणू करु शकतात. त्यामुळं ग्राहकांनी मोबाईल फोन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा PIN, CVV, OTP आणि कार्डच्या डिटेल्स इतरांशी शेअर करु नका, असं बँक ऑफ इंडियानं कळवलं आहे.

बँक ऑफ इंडियाचं ट्विट

ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रकार

कोरोना विषाणू संसर्गाचा काळ असल्यानं डिजीटल व्यवहार वाढेलेले आहेत. डिजीटल आणि ऑनलाईन व्यवहार वाढल्यानं ग्राहकांना विविध मार्गानं फसवलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहणं आवश्यक आहे. ऑनलाईन व्यवहार वाढत असल्यानं ग्राहकांनी त्यांची खासगी माहिती शेअर करताना सतर्कता बाळगली पाहिजे.

फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करणार?

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यानं सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क करत असतात. जर एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असल्यास ते भारत सरकारच्या https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.

ही माहिती शेअर करु नका

ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.

संबंधित बातम्या:

SBI Alert | स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

SBI, ICICI आणि PNB च्या ग्राहकांनो सावधान; अन्यथा बँकेचं खाते होईल रिकामं

(Bank of India issue Alert to its customer beware of the sharing details on social Media Platforms)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.