क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेणे आता नाही सोपे, RBI ने नियम केले कडक

Credit Card RBI | भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जाविषयी नियम अजून कडक केले. त्यामुळे बँकांना आणि ग्राहकांना दोघांना पण अडचण येण्याची शक्यता आहे. असुरक्षित कर्जाविषयी केंद्रीय बँकेने कडक भूमिका घेतली आहे. काय बदलले नियम, त्याचा कसा होईल परिणाम, घ्या जाणून..

क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेणे आता नाही सोपे, RBI ने नियम केले कडक
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : अनेकदा गरजा पूर्ण करण्यासाठी कधी ना कधी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यावेच लागते. काही जण क्रेडिट कार्डचा वापर करुन गरज भागवतात. अनेक खासगी बँका झटपट कर्ज देतात. काही कागदपत्रांआधारे अवघ्या काही मिनिटात तुमच्या खात्यात पैसा जमा होतो. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या हीच पद्धत वापरतात. अशा कर्जांना असुरक्षित कर्ज मानण्यात येते. आता या झटपट कर्ज प्रक्रियेला आडकाठी येऊ शकते. वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यात ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने याविषयीच्या नियमात बदल केला आहे. नियम अधिक कडक केले आहेत. बँका आणि एनबीएफसीला या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

RBI ने केला असा बदल

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी याविषयीची भूमिका जाहीर केली. बँका आणि नॉन बँकिंग कंपन्यांना असुरक्षित कर्जासाठी त्यांच्या पोर्टफोलिओत अधिक रक्कम ठेवावी लागेल असे आरबीआयने स्पष्ट केले. हा निधी 100 टक्के होता. हा निधी वेगळा ठेवावा लागत होता. आता त्यात 25 टक्के वाढ झाली आहे. बँकाना आता 125 टक्के निधी राखीव ठेवावा लागणार आहे. समजा बँकेने 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन दिले असेल तर त्यासाठी बँकांना 5 लाख रुपये वेगळे ठेवावे लागत होते. बदललेल्या नियमानुसार आता बँकांना 25 टक्के अधिक म्हणजे 6 लाख 25 हजार राखीव ठेवावे लागतील.

हे सुद्धा वाचा

काय होईल परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार, बँका आणि वित्तीय संस्थांना आता जादा रक्कम राखीव ठेवावी लागेल. त्यामुळे बँकांच्या वित्तीय प्रक्रियेवर परिणाम होईल. मोठा निधी राखीव ठेवावा लागेल. यापूर्वी बँका बिनधास्त कर्ज, क्रेडिट कार्डची ऑफर देत होत्या. आता त्यात बदल होऊ शकतो. त्यासाठी नियमात बदल होऊ शकतो. ग्राहकांसाठी निकष येऊ शकतात.

का घेतला हा निर्णय

गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांच्यात वाढ झाली. असुरक्षित कर्जाचे प्रमाण वाढले आहे. क्रेडिट कार्ड वाटपाच्या संख्येत पण मोठी वाढ झाली आहे. पण त्याचवेळी कर्ज बुडवण्याचे, हप्ते थकविण्याचे प्रमाण पण वाढले आहेत. त्यामुळेच आरबीआयने नियम कडक केले आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.