Gold Silver Rate Today : सोने-चांदी भिडले गगनाला, भाव जबरदस्त वाढले

Gold Silver Rate Today : सोने आणि चांदीने गेल्या तीन दिवसांत दरवाढीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. सोने-चांदीत मोठी उसळी आली. चांदीने तर चार दिवसांत कहर केला. या दोन्ही धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. दिवाळीनंतर वायदे बाजारातील सोने-चांदी वधारले. तर सराफा बाजारात पण दोन्ही धातूंनी दरवाढीची वर्दी दिली.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी भिडले गगनाला, भाव जबरदस्त वाढले
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : सराफा बाजारात सोने-चांदीने दरवाढीचे सत्र आरंभले. गेल्या तीन ते चार दिवसांत सोने-चांदीत मोठी उलाढाल दिसून आली. शुक्रवारी जळगाव येथील सराफा पेठेत सोने 700 रुपये तर चांदी दोन हजार रुपयांनी वधारली होती. भाव वधारल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. वायदे बाजारात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात दिवाळीनंतर भाववाढ समोर आली. मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला. त्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याला भाववाढ झली होती. आता सोने-चांदीचा (Gold Silver Price Today 18 November 2023) असा आहे भाव…

सोने महागले

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीत ऑक्टोबरच्या तुलनेत मोठी उसळी आली नव्हती. पण आता सोने वधारले आहे. या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. 16 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 17 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांनी वधारले.गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची 4100 रुपयांची मुसंडी

या आठवड्यात चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ दिसली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीत 1500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,170 रुपये, 23 कॅरेट 60,925 रुपये, 22 कॅरेट सोने 56,032 रुपये झाले. 18 कॅरेट 45,878 रुपये, 14 कॅरेट सोने 35,785 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,747 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.