वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अशा प्रकारे पाच व्यवहार केल्यास येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस

रोख खर्च कमी करण्यासाठी, डिजिटलचा ट्रेंड वाढविण्यासाठी आयकर विभाग आणि बँका, म्युच्युअल फंड हाऊस, ब्रोकर प्लॅटफॉर्म्स इत्यादी रोख व्यवहार कमी करण्यासाठी आग्रह धरत आहेत. (Big news for those who frequently make cash transactions, thus making five transactions can result in income tax notice)

वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अशा प्रकारे पाच व्यवहार केल्यास येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

नवी दिल्ली : आपल्यालाही नोटांचे गठ्ठे खर्च करण्याचा शोक असेल तर ही आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. जर आपण डिजिटल पेमेंटऐवजी रोख खर्च करीत असाल तर मग आयकर विभागाची आपल्यावर नजर आहे हे लक्षात ठेवा. लोकांनी नोट्स आणि नाणी यातून बाहेर पडावे आणि मोबाइल फोन किंवा संगणकाद्वारे व्यवहार करावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु रोख खर्च करण्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचा एक गट देखील आहे. अशा लोकांना डिजिटल व्यवहार आवडत नाहीत. (Big news for those who frequently make cash transactions, thus making five transactions can result in income tax notice)

रोख खर्च कमी करण्यासाठी, डिजिटलचा ट्रेंड वाढविण्यासाठी आयकर विभाग आणि बँका, म्युच्युअल फंड हाऊस, ब्रोकर प्लॅटफॉर्म्स इत्यादी रोख व्यवहार कमी करण्यासाठी आग्रह धरत आहेत. गेल्या काही वर्षांत, रोख व्यवहार कमी करण्यासाठी बँकांनी बरेच नियम कठोर केले आहेत. जसे की एटीएममधून अधिक व्यवहार केल्यास चार्ज लावणे, एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करणे इ. लोकांना रोख रकमेपासून डिजिटलकडे वळवणे हाच एकमेव उद्देश आहे जेणेकरुन सरकारचा नोटांवर होणारा खर्च कमी होईल. एटीएममधून किती रोख रक्कम काढता येईल आणि किती वेळा पैसे काढता येतील याची मर्यादा बँकांनी त्यांच्या वतीने निश्चित केली आहे. जर याचे अनेकदा उल्लंघन होत असेल तर आयकर विभाग कारवाई करू शकते. 5 मुख्य रोख व्यवहार आहेत ज्यात आयकर नोटिस येऊ शकते.

बँक एफडी (फिक्स डिपॉजिट)

बँकेच्या एफडीमध्ये रोख जमा करण्याची परवानगी आहे, परंतु ते 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. हे ठेवीदार आणि बँक दोघांसाठीही चांगले नाही. ज्या बँकेच्या एफडी खात्यात या मर्यादेपेक्षा जास्त ठेवी असतील त्या ठेवीदार आणि ठेवी जमा करणारे दोघांनाही आयकरद्वारे नोटीस येऊ शकते.

रियल एस्टेट

जो व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये पैशांची गुंतवणूक करतो त्याने नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत आहे. ही मर्यादा ओलांडल्यास आपण संशयाच्या फेऱ्यात येऊ शकता. रिअल इस्टेट डीलमध्ये आयकर विभाग मालमत्ता खरेदी किंवा विक्रीसाठी 30 लाख रुपयांपर्यंत रोख रकमेची परवानगी देतो. त्यापेक्षा अधिक केल्यास आपल्याला नोटिस येऊ शकते. म्हणूनच 30 लाखांपेक्षा रोखीचे व्यवहार टाळा.

सेविंग-करंट अकाउंट

बचत खात्यात रोख जमा करण्याची मर्यादा 1 लाख रुपये आहे. एखाद्या व्यक्तीने बचत खात्यात 1 लाखाहून अधिक रोख रक्कम जमा केल्यास आयकर विभाग त्याला नोटीस पाठवू शकतो. चालू खात्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये आहे. यावर जमा केल्यास आयकर विभाग आपल्याविरूद्ध कारवाई करू शकते.

म्युचुअल फंड/स्टॉक मार्केट/बॉन्ड/डिबेंचर

जे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉन्ड्स किंवा डिबेंचरमध्ये पैसे गुंतवतात त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की एका वेळी 10 लाखाहून अधिक रोख रक्कम जमा करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्याने आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. आपण त्याचे तपशील प्राप्तिकर परतावा (आयटीआर) मध्ये पाहू शकता.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

क्रेडिट कार्ड बिल जमा करताना रोखीच्या ठेवींबद्दल सावधगिरी बाळगा. क्रेडिट कार्ड बिल एकावेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कमेमध्ये जमा करता येणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन केल्यास आयकर विभाग आपल्याला नोटीस बजावू शकतो. (Big news for those who frequently make cash transactions, thus making five transactions can result in income tax notice)

इतर बातम्या

कोविन-अ‍ॅपमधील त्रुटी गंभीर, प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्या, जयंत पाटलांची मागणी

जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI