AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम

देशभरातील 6 कोटी पीएफ खातेधारकांसाठी मोठ बातमी आहे. तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेत केंद्र सरकारने कर्मचा-यांना त्यांच्या खात्यांतून 75 टक्के आगाऊ रक्कम काढण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे पैशांची चणचण असेल तेव्हा कर्मचा-यांना उचित कारणासह पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल.

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम
ईपीएफ
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली :  देशातील नोकरदार वर्गासाठी चांगली बातमी आहे. आता त्यांना पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार आहे. कोरोना महामारीच्या काळात पीएफ खातेधारकांना (PF account holders) आगाऊ रक्कम(Advance) काढण्याचा लाभ मिळत होता. ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation) पीएफ खातेधारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. ज्यामुळे भागधारकांना त्यांच्या खात्यातून 75% पर्यंत आगाऊ रक्कम काढता येईल. कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही सवलत देण्यात आली आहे. कोरोना काळात नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले. काहींच्या नोक-या गेल्या तर काहींना कमी वेतनावर काम करावे लागत आहे. त्यात पुन्हा तिस-या लाटेची भीती आहे. त्यामुळे कर्मचा-यांना अचानक मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासल्यास त्याला पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार आहे. ही रक्कम खातेधारक ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. भविष्य निर्वाह निधी संघटने याविषयीची सुविधा पुन्हा सुरु केली आहे.

तीन दिवसांत दावा निकाली

याविषयी ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पीएफचे भागधारक स्वत:च्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी किंवा कोरोनानंतरच्या उपचारांसाठी ही आगाऊ रक्कम घेऊ शकतात. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांनी पहिल्या आणि दुस-या लाटेच्यावेळी आगाऊ रक्कम काढली होती. त्यांनाही आता पीएफ खात्यातील शिल्लकीतून आगाऊ रक्कम काढता येईल. असे दावे तीन दिवसांत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोविड अॅडव्हान्स मिळवण्यासाठी लाभार्थी सदस्याला दावा अर्ज (Claim Form) भरावा लागेल, ज्यामध्ये मागितलेला तपशील भरावा लागेल. संबंधित तपशील भरल्यानंतर हा दावा ऑनलाईन माध्यमातूनच ईपीएफओकडे पाठवावा लागणार आहे. दावा जमा होताच लाभार्थीला नोंदणीकृत बँक खात्याचा तपशीलही सामायिक (Share) करावा लागणार आहे. एका अंदाजानुसार या सुविधेचा लाभ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात प्रत्येकाला संकटाला तोंड द्यावे लागले. प्रत्येकाने वाईट काळ अनुभवला. प्रत्येकाच्या कामावर कोरोनाचा परिणाम दिसून आला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. विशेषतः ज्यांच्या घरात वृद्ध अथवा आजारी व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी ही कसोटीची वेळ होती. त्यांना उपचारांसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे कोरोना काळात सुरु करण्यात आलेली अॅडव्हान्सची सुविधा या वर्षी ही सुरुच ठेवणे आवश्यक आहे. कारण खातेधारकाचा पैसा त्याच्या उपयोगात येईल, असे ईपीएफओ बोर्डाचे सदस्य सुखदेव प्रसाद मिश्रा म्हणाले.

 इतर बातम्या:

सिनेमासाठी केवळ एक रूपयाचं मानधन ते अमिताभ बच्चनपेक्षा जास्त फी, फिल्मफेयर पुरस्कार नाकारणारे अभिनेते प्राण यांची 102 वी जयंती

नांदेडच्या अंकिताची मोठी झेप, परिस्थितीवर मात करत मुंबईच्या KEM मध्ये MBBS ला प्रवेश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.