ट्रम्प तात्या निवडून येताच मित्राला लक्ष्मी दर्शन; Elon Musk याने झटक्यात कमावले 2000000 कोटी

Elon Musk Earning : अमेरिकेत सत्ता परिवर्तन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प नवीन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर जगभरातील शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाल्या. तर ट्रम्प यांचा मित्र आणि कोट्याधीश उद्योजक याला एकाच दिवसात लॉटरी लागली. त्याने झटक्यात 2 लाख कोटी रुपये कमावले.

ट्रम्प तात्या निवडून येताच मित्राला लक्ष्मी दर्शन; Elon Musk याने झटक्यात कमावले 2000000 कोटी
एलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:19 AM

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेसह जगातील शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांना तर एकाच दिवसात लॉटरी लागली. मस्क आणि ट्रम्प यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांनी अवघ्या 24 तासात 2 लाख कोटी रुपयांची कमाई केली. अमेरिकन बाजारातील तेजीमुळे टेस्लाचा शेअर (Tesla Share) 15 टक्क्यांनी उसळला.

ट्रम्प यांच्या विजयाने शेअर बाजार बहरला

अमेरिकेमधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचे तोरण बांधताच अमेरिकन शेअर बाजारात बहर आला. डोऊ जोन्समध्ये 3.57 टक्क्यांची तेजी दिसली. तो 43,729 अंकावर पोहचला. तर S&P500 जोरात धावला. त्याने 2.53 टक्क्यांची उसळी घेतली. तर Nasdaq जवळपास 3 टक्क्यांनी वधारला. अमेरिकन बाजारातील या उसळीमुळे अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये रेकॉर्ड तेजी दिसून आली. अमेरिकेतील दिग्गज उद्योजकांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ दिसून आली.

हे सुद्धा वाचा

एका झटक्यात वाढली संपत्ती

ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेतील बाजारात तेजीचे सत्र आले. त्याचा सर्वाधिक फायदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याला झाला. त्याच्या एकूण संपत्तीत मोठी उसळी आली. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, एलॉन मस्क याची एकूण संपत्ती 2,23,265 कोटी रुपयांनी वाढली. संपत्तीमधील या वाढीमुळे एलॉन मस्क यांची संपत्ती 290 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली आहे.

टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठी उसळी

एलॉन मस्क याच्या संपत्तीमधील या उसळीमागे त्यांची इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी टेस्ला शेअरमधील तेजी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने टेस्ला शेअरमध्ये जवळपास 15 टक्क्यांची उसळी आली. टेस्लाचा शेअर 284.67 डॉलरवरून 289.59 डॉलरवर पोहचला. बाजार बंद होताना एलॉन मस्क यांच्या कंपनीच्या या स्टॉकमध्ये 14.75 टक्क्यांची जोरदार उसळी आली. हा स्टॉक 288.53 डॉलरवर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता पुढील पाच वर्षे टेस्लाच्या अनेक प्रकल्पाला मोठी मदत मिळणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री सर्वश्रुत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....