बजेटपूर्वी सोने दर 34 हजार 300, दोन तासात सोने दरात 1400 रुपये वाढ

सोनेदराने आधीच गगन भरारी घेतली आहे. त्यातच आयात शुल्क वाढवल्यामुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे सोने दराने आजपर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला.

import duty on gold rate hike, बजेटपूर्वी सोने दर 34 हजार 300, दोन तासात सोने दरात 1400 रुपये वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या पदरी निराशा पडली. पेट्रोल-डिझेलवरील अधीभार 1 रुपयांनी वाढवला. त्यामुळे सर्वकाही महागणार आहे. शिवाय सोन्यावरील आयात शुल्कही 10 टक्क्यावरुन 12.5 टक्केपर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे आता सोने महागणार हे निश्चित आहे.

सोनेदराने आधीच गगन भरारी घेतली आहे. त्यातच आयात शुल्क वाढवल्यामुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे सोने दराने आजपर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला.

सोनेदर 34 हजार 300 रुपये प्रतितोळा होता. आता आयात शुल्क वाढीमुळे सोने प्रतितोळ्याचा दर 35 हजार 700 रुपये झाला आहे. आजच्या आज सोन्याचा दर केवळ तीन तासात बदलला. बजेटपूर्वी आज सकाळी सोने दर 34 हजार 300 रुपये होता, त्यात 1400 रुपये वाढ होऊन दुपारपर्यंत सोने दर 35 हजार 700 रुपयांवर पोहोचला.

मुंबईतील सोने बाजार – अर्थात झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट कुमार जैन यांनी याबाबतची माहिती दिली.

जैन म्हणाले, “आधी GST 3 टक्के आणि ड्युटी 10 टक्के असं मिळून 13 टक्के टॅक्स होता. आता 13 टक्के अधिक  2.5 वाढले, त्यामुळे एकूण 15.5 टक्के वाढ झाले. त्यामुळे वाढलेल्या अडीच टक्क्यामुळे सोने दरात थेट सुमारे 1100 रुपये वाढ होईल”

दरम्यान, बजेटमध्ये जाहीर केलेले कराचे दर हे नोटिफिकेशन किंवा अधिसूचना निघाल्यानंतर लागू होतात.  मात्र सोने दरात तात्काळ वाढ का झाली हा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या 

जळगावात सोने दर 34 हजारावर, पाकिस्तानात प्रतितोळा 80 हजार 500   

सोनेदराचा सहा वर्षातील उच्चांक, जळगावात सोन्याचे दर….. 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *