Budget 2024 : इन्कम टॅक्स सवलतीच्या आशा खल्लास, मध्यमवर्गीयांनी काढली भडास, Memes चा महापूर

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मात्र इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल न झाल्याने सोशल मीडियावर मिडल क्लास अर्थात मध्यमवर्गीयांबद्दल मीम्सचा पाऊस पडला. इन्कम टॅक्समध्ये काही सवलत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आजच्या बजेटमुळे मध्यमवर्गीयांच्या सर्व आशा-अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.

Budget 2024 : इन्कम टॅक्स सवलतीच्या आशा खल्लास, मध्यमवर्गीयांनी काढली भडास, Memes चा महापूर
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 3:23 PM

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आयकर पद्धतीत काय बदल होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गाला खुश करण्यासाठी आयकराची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा होती. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही. मागील वर्षांप्रमाणे आयकर राहणार आहे. म्हणजेच सात लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर राहणार नाही. पण स्टार्टअपसाठी कर सवलत एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

या सर्वांदरम्यान आयकरात कोणताही बदल न झाल्याने सोशल मीडियावर मिडल क्लास अर्थात मध्यमवर्गीयांबद्दल मीम्सचा पाऊस पडला आहे. आयकर सवलतीच्या मध्यमवर्गीयांच्या आशा धुळीला मिळाल्यामुळे फेसबूक, ट्विटर सर्वत्र भरपूर लोकं पोस्ट्स करत आहेत. त्यातच एका युजरने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालालचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तो म्हणतोय – पोपट रे पोपट, सगळीकडे माझा पोपट होतोय.

तर आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल न झाल्याल्याबद्दल, एका युजरने अजय देवगणचा फोटो त्याच्या चित्रपटातील संवादासह शेअर केला. ‘ काहीही बदललेले नाही, आजही सगळं काही तसंच आहे.’ अशी कमेंट त्याने लिहीली आहे.

आयकराच्या स्लॅबबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काय विचार केला असेल, असे एका यूजरने लिहिले आहे. त्यासोबत त्याने 3 इडियट्स चित्रपटातील एका दृश्याचा फोटो शेअर केला. ‘जैसा चल रहा वैसा चलने दो’ असा संवाद त्यामध्ये आहे.

तर आणखी एका युजरने मजेदार व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन लिहीली – बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल न झाल्याने मध्यमवर्गीय माणसाची काय अवस्था झालीये, पहा. यामध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर एक व्यक्ती उत्तर देताना दिसत आहे की, आम्ही सध्या काही सांगू शकत नाही, आम्ही सध्या डिप्रेशनमध्ये आहोत.

तर आणखी एका युजरने एक GIF शेअर केला ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती काही नाणी मोजताना दिसत आहे. ‘सॅलरीवाली माणसं इन्कम टॅक्स भरल्यावर त्यांची बचत मोजत आहेत’, असं त्याखाली लिहीलं आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये क्रिकेटर विराट कोहली मैदानात पडलेला दिसत आहे. ‘ अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल न केल्यामुळे मध्यमवर्गीय माणसाची झालेली अवस्था’ अशी कॅप्शन आणखी एका युजरने त्या फोटोसोबत लिहीली आहे.

निर्मला सीतारमण यांच्या भाषणादरम्यान मिडल क्लास लोकांची स्थिती… अशी कॅप्शन लिहीत एका फोटो शेअर केला, तोही मजेदार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.