Budget Maldives | मालदीवचे अगोदर वाजवले दिवाळे, आता बजेटमध्ये कोट्यवधींचा पाऊस

Budget Maldives | मालदीवच्या नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांचे काही सहकाऱ्यांनी भारताविरोधात आग ओकली. त्यानंतर भारताकडून बायकॉट मालदीवचा ट्रेंड सुरु झाला. त्यात मालदीवचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पण केंद्रीय अर्थसंकल्पात मालदीवला कोट्यवधींची भेट देण्यात आली आहे.

Budget Maldives | मालदीवचे अगोदर वाजवले दिवाळे, आता बजेटमध्ये कोट्यवधींचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 3:21 PM

नवी दिल्ली | 2 February 2024 : मालदीव या हिंद महासागरातील चिमुकल्या देशाने भारताविरोधात आग ओकली. नवीन राष्ट्राध्यक्ष आणि तिथल्या काही चीनी धार्जिण्या मंत्र्यांनी कुरापत काढली. संबंध ताणल्या गेले. भारतीय कंपन्या आणि पर्यटकांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यात पर्यटनावर जगणाऱ्या या देशाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हा देश भारताच्या मेहरबानीवर मोठा झाला आहे. पण आता स्थिती बदलली आहे. सध्या दोन्ही देशात वाद सुरु आहेत. पण मालदीवसाठी काल सादर झालेल्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कोट्यवधींचा निधी मालदीवला देण्यात आला आहे.

600 कोटी रुपये दान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी मालदीवला 600 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही आर्थिक मदत आर्थिक वर्ष 2024-25 साठी देण्यात आली आहे. यापूर्वी 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारने 400 कोटी रुपये मालदीवला दिले होते. त्यात नंतर वाढ करुन 770 कोटी रुपये करण्यात आले. आता हे दान मालदीवला का देण्यात येते, त्याचा काय उपयोग होतो, हे समजून घेऊ.

हे सुद्धा वाचा

भारताने का दिला पैसा

भारत शेजारील राष्ट्रांसोबत अनेक विकास प्रकल्पात सोबत काम करतो. या योजनांसाठी अनुदान देण्यात येते. मालदीवला जी रक्कम देण्यात येत आहे, ते कर्ज नाही तर पूर्णपणे अनुदान आहे. भारताने मालदीव येथील पायाभूत सुविधांसाठी यापूर्वी पण मोठी रक्कम खर्च केली आहे. यावेळी बजेटमध्ये मालदीव येथली पायाभूत सुविधांसाठी 600 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. ही रक्कम संरक्षण आणि भारत-मालदीवला जोडणाऱ्या प्रकल्पांसाठी महत्वाची आहे.

भूतान आणि नेपाळ पण मदतीचा हात

  1. केंद्र सरकारने गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पण भूतानला भरघोस मदत केली
  2. भूतानला 2,068 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे
  3. तर नेपाळला 700 कोटी रुपयांची मदत
  4. केंद्राने दोस्त राष्ट्रांसाठी आर्थिक मदतीची मर्यादा 5,667 कोटी रुपये केली
  5. यामध्ये मालदीव, श्रीलंका, नेपाळ, भूतान सह इतर देशांचा पण समावेश आहे
  6. या अंतरिम अर्थसंकल्पात या देशाने कर्जापेक्षा अनुदान जास्त
  7. एकूण 5,667 रक्कमेत 4,677 कोटी रुपयांचे अनुदान
  8. तर भूतानला 1000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे
  9. म्यानमारच्या (ब्रह्मदेश) मदत राशीत कपात करुन ती 250 कोटी करण्यात आली
Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.