AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत…; मनोज जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप

इंधन दरवाढ आणि तुटवड्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली असून, शेतकऱ्यांनी नांगरणी व पेरणी न करता मोदींच्या आवाहनाला साथ द्यावी, असा खोचक टोला लगावला आहे.

मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत...; मनोज जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप
manoj jarange
| Updated on: May 22, 2026 | 10:28 AM
Share

सध्या देशभरात आणि राज्यात इंधनाच्या तुटवड्यामुळे आणि दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ दिली पाहिजे, शेतकऱ्यांनी आता शेती कोरडी पडली तरी चालेल पण पेरण्या आणि नांगरणी करू नये,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचे असेल तर लोकांनी कसे जायचे?

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच सध्याच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांचे वास्तव मांडले. सध्या ग्रामीण भागात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सध्या ट्रॅक्टर शेतात उभा आहे आणि त्याचा मालक पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन रांगेत उभा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या जर घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, किंवा कुठे सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचे असेल तर लोकांनी कसे जायचे? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

 निवडणुका संपेपर्यंत गाड्या दणादण पळवल्या

सरकारने आता स्वतःच्या सोयीनुसार वागणे सुरू केले आहे. जोपर्यंत निवडणुका सुरू होत्या, तोपर्यंत यांनी प्रचारासाठी दणादण गाड्या पळवल्या. तेव्हा त्यांना पेट्रोल-डिझेल कमी पडले नाही आणि सर्व काही सुरळीत मिळत होते. पण निवडणुका संपताच सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मी डोक्याला तेल लावणेही बंद केले

यावेळी जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. “मोदींचे आवाहन खरोखरच अवघड आहे. मी त्यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. अगदी मी डोक्याला तेल लावणेही बंद केले आहे, कारण त्यांच्यामुळेच मी आता तेल वाचवा अशी मोहीम सुरू केली आहे. सरकारने या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सध्या राज्यात इंधन टंचाई आणि वाढत्या दरामांमुळे शेतीकामांना मोठा ब्रेक लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.