7th Pay Commission DA Hike | देशभरातील केंद्रीय कर्मचारी (Central Employees) वेतनवृद्धीच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA Hike) देऊन खूष केले आहे. काही राज्यांनी (State Government) घोषणा केल्याप्रमाणे पुढील महिन्यांत त्यांच्या पगारात डीएची रक्कम जमा होणार आहे. आता केंद्रीय कर्मचारी ही त्यांचा डीए वाढीच्या प्रतिक्षेत आहे. मार्च 2022 मध्ये महागाई भत्ता देण्यात आला होता. आता या गोष्टीला सहा महिने होत आले आहेत. तरीही सरकारने डीए वाढीचा निर्णय अजेंड्यावर घेतलेला नाही. त्यातच पुन्हा या महिन्याच्या शेवटी (August Month End)सरकार महागाई भत्ता देईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर हा अंदाज चुकला तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीए मिळण्याची शक्यता आहे. पण सरकारने डीए देण्याविषयी कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.