Elon Must Coca cola : ट्विटरनंतर आता मस्क खरेदी करणार कोका-कोला कंपनी; ट्विट करत सूचक वक्तव्य

सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या (Twitter) खरेदीनंतर आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी जगप्रसिद्ध पेय असलेल्या कोका-कोला कंपनीच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी तसे संकेत ट्विटरवरून देखील दिले आहेत.

Elon Must Coca cola : ट्विटरनंतर आता मस्क खरेदी करणार कोका-कोला कंपनी; ट्विट करत सूचक वक्तव्य
Image Credit source: Facebook
अजय देशपांडे

|

Apr 28, 2022 | 11:08 AM

सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या (Twitter) खरेदीनंतर आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी जगप्रसिद्ध पेय असलेल्या कोका-कोला कंपनीच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी तसे संकेत ट्विटरवरून देखील दिले आहेत. सध्या एलन मस्क (Coca Cola) यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, आता मी कोको-कोला कंपनी खरेदी करणार आहे. सध्या एलन मस्क हे ट्विटरवर सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहेत. ते सध्या ट्विटरच्या माध्यमातून आपल्या फॉलोर्ससोबत संवाद साधताना दिसून येत आहेत. त्यांनी यापूर्वी ट्विटर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर मस्क यांनी तब्बल 44 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 3368 अब्ज रुपयांना ट्विटर खरेदी केले. आता मस्क यांनी आपण कोका-कोला खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच मस्क हे कोको-कोला कंपनीचे मालक बनण्याचे शक्यता आहे. ट्विटर नंतर या संभाव्य व्यवहाराकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.

ट्विटर खरेदीनंतर मस्क यांची प्रतिक्रिया

एलन मस्क यांनी यापूर्वी आपण ट्विटर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते, ट्विटर हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून, मायक्रो – ब्लॉगिंग साईट म्हणून देखील ट्विटरची ओळख आहे. एलन मस्क यांनी तब्बल 44 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 3368 अब्ज रुपयांना ट्विटर खरेदी केले. या व्यवहारांकडे सर्व उद्योग जगताचे लक्ष लागले होते. अखेर मस्क यांनी ट्विटर खरेदी केले. ट्विटर खरेदी केल्यानंतर ते म्हणाले की, लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी भाषण स्वतंत्र्य आवश्यक असते, पुढील काळात ट्विटर हे नागरिकांच्या विचारांचे एक प्रबळ व्यासपीठ बनेल. तसेच ट्विटरमध्ये वापरकर्त्यांना उपयोगी ठरतील अशा आणखी काही नव्या फिर्चसची निर्मिती केली जाईल.

1886 साली कोका -कोलाची स्थापना

एलन मस्क यांनी आपण कोको-कोला कंपनी विकत घेणार असल्याचे जाहीर करताच कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कंपनीची स्थापना 1886 साली अमेरिकेमधील जॉर्जियात करण्यात आली होती. आज 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोका-कोलाच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. या कंपनीचे जगभरात 900 पेक्षा अधिक प्लांट आहेत. एका रिपोर्टनुसार या कंपनीने जगभरातील जवळपास 7 लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें