सेन्सेक्स गडगडला, बाजार कोसळला, 5 मिनिटात 5 लाख कोटींचा चुराडा

शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक (Sensex down) तब्बल 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:21 AM, 28 Feb 2020
सेन्सेक्स गडगडला, बाजार कोसळला, 5 मिनिटात 5 लाख कोटींचा चुराडा

मुंबई : कोरोना व्हायरसचा (coronavirus impact) कहर आता शेअर बाजारात (Sensex down) दिसत आहे. कारण शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक (Sensex down) तब्बल 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 294 अंकांनी घट झाली. अवघ्या पाच मिनिटात गुंतवणूकदारांचा तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. बाजार उघडल्या उघडल्या सेन्सेक्समध्ये आधी 658 अकांनी घट झाली. त्यामध्ये आणखी घट होऊन सकाळी 9.39 वाजेपर्यंत बाजार तब्बल 1130 अंकांनी गडगडून सेन्सेक्स 38615 अंकांवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनचे ज्या देशांची व्यवहार आहेत,  त्यांना फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण झाली. फॉरेन इन्व्हेस्टर्स शेअर विकून पळ काढत आहेत, त्यामुळे शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे, असं बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितलं.

बाजारात गडगडाट का?

चीनमध्ये कोरोना विषाणून धुमाकूळ घातल्याने, अनेकांचा जीव गेला आहे. त्याचा परिणाम चीनमधील उद्योगावर आणि पर्यायाने आयात-निर्यातीवर झाला. त्यामुळे जागतिक बाजारावरही आपोआपच त्याचा परिणाम दिसून आला. गुंतवणूकदार आपली गुंतवणूक मागे घेत, बाजारातून पैसे काढत आहेत. त्यामुळे साहजिकच जागतिक निर्देशांक गडगडत असल्याने, त्याचे हादरे मुंबई शेअर बाजारालाही बसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचा शेअर बाजार 2008 नंतर सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला.

कोणकोणते शेअर्य घसरले?

बाजार गडगडल्याने  त्याचा फटका अनेक शेअर्सला बसला. टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, हिंडाल्को, वेदांता, टेक महिंद्रा आणि इन्फ्राटेल यासारखे शेअर्स कोसळले.

संपूर्ण आठवडाभर बाजारात निराशा

या आठवड्यात बाजारात निराशा पाहायला मिळाली. गुरुवारी निर्देशांकात 143 अंकांची घट होऊन सेन्सेक्स 37,745.66 अंकावर  बंद झाला होता.