AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : क्रिकेटर श्रेयस अय्यरची दमदार इनिंग; मुंबईत केली कोट्यवधींची गुंतवणूक, आईसह खरेदी केले आलिशान अपार्टमेंट

Shreyas Iyer Apartments : भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर याने गुंतवणुकीच्या पीचवर पुन्हा एकदा दमदार खेळी खेळली. यापूर्वी त्याने मुंबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. आता त्याने मुंबईतील मुख्य भागात आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत कोट्यवधीत आहे.

Shreyas Iyer : क्रिकेटर श्रेयस अय्यरची दमदार इनिंग; मुंबईत केली कोट्यवधींची गुंतवणूक, आईसह खरेदी केले आलिशान अपार्टमेंट
कोट्यवधींचे अपार्टमेंट केले खरेदी
| Updated on: Sep 28, 2024 | 9:58 AM
Share

भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिणी अय्यर यांनी मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत जवळपास 2.90 कोटी रुपये आहे. यापूर्वी पण श्रेयसने मुंबईत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता त्याने मुंबईतील वरळी भागात नवीन लक्झरियस अपार्टमेंट खरेदी केले. या 19 सप्टेंबर रोजी या मालमत्तेची नोंदणी झाली. इराणी कप 2024 साठी मुंबईतील टीममध्ये त्याला संधी देण्यात आली आहे.

आदर्शनगरमध्ये खरेदी केले अपार्टमेंट

श्रेयस अय्यर याने मुंबईतील वरळी भागात नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. आदर्श नगरातील त्रिवेणी इंडस्ट्रीयल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. त्याची जागा 525 चौरस फूट आहे. हे घर त्याच्या आईने 55,238 रुपये प्रति चौरस फूट या दराने खरेदी केले आहे. दस्तावेजानुसार, 19 सप्टेंबर रोजी त्याने त्यासाठी 17.40 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) जमा केले. तर त्यानंतर 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क अदा केले. हिंदुस्थान टाईम्सने याविषयीची माहिती दिली आहे.

मुंबईत यापूर्वी पण खरेदी

यापूर्वी पण श्रेयस अय्यर याने मुंबईत घर खरेदी केले आहे. त्याने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबईतील सर्वात उंच इमारतीमधील एक लोढा वर्ल्ड टावर्समध्ये त्याने एक घर खरेदी केले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये त्याने The World Towers च्या 48 व्या मजल्यावर 2,380 चौरस फुटाचे घर खरेदी केले. या अपार्टमेंटमध्ये 3 कार पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांनी मुंबईत व्यावसायिक जागा खरेदी केली. त्या खेळाडूंच्या यादीत जुलै 2024 मध्ये अय्यर सामील झाला.

आता इराणी कपमध्ये खेळणार

श्रेयस अय्यरला 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी कपमध्ये मुंबई विरुद्ध उर्वरीत भारत या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. तो मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अय्यर सर्वात अखेरीस या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये भारतीय संघात खेळाताना दिसला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी त्याने खेळली. घरगुती सामन्यात हजेरी न लावल्याने BCCI ने त्याला केंद्रीय करार यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता तो नियमितपणे देशातंर्गत सामने खेळत आहे. त्यामुळे लवकरच त्याचे भारतीय क्रिकेट खेळात दर्शन होण्याची शक्यता आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.