Ukraine Russia Conflict : इलेक्शन फीव्हरमुळे ‘महागाई’ लांबणीवर, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. सध्या कच्चा तेलाच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण भारतात पाच राज्यांच्या निवडणुकींचा माहोल आहे. यातील उत्तरप्रदेशातील निकाल आगामी लोकसभा निवडणुकीचे प्रतिबंब मानण्यात येत आहे. त्यामुळे येथे हाराकिरी भाजपची सत्ता डळमळीत करु शकते. त्यापार्श्वभूमीवर देशात इंधन दरवाढ केल्यास त्याचा फटका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकल्या तरी तुर्तास सरकारने त्यांच्याकडील जादुची कांडी फिरवली आहे. एकदा निवडणुकीचे निकाल घोषीत झाले की, जनतेवर महागाईचे संकट कोसळणार हे सांगायला ज्योतिषी थोडाच लागणार आहे.

Ukraine Russia Conflict : इलेक्शन फीव्हरमुळे 'महागाई' लांबणीवर, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
फोटो - गुगल
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 8:34 AM

युक्रेनवर दिवसागणिक युद्धाचे ढग गडद होत आहे. रशियाचे लाखो सैनिक युक्रेनच्या (Ukraine Russia Conflict ) सीमांवर पुढील आदेशाची वाट पाहत आहेत. हजारो किलोमीटरवरील रणसमरातील घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती (Crude oil prices) गगनाला भिडल्या आहेत. गेल्या सात वर्षांत तेलाच्या किंमती आटोक्यात होत्या. आता तेलाच्या किंमती 20 टक्क्यांनी भडकल्या आहेत. पण गंमत बघा, तेलाच्या किंमती पेट्रोल कंपन्या ठरवतात, सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही अशी ठेवणीतील बतावणी कुठेही ऐकू येत नाही. कारण देशात निवडणुकांचे (Election Fever) वारे वाहत आहेत. भारतात पाच राज्यांच्या निवडणुकींचा माहोल आहे. यातील उत्तरप्रदेशातील निकाल आगामी लोकसभा निवडणुकीचे प्रतिबंब मानण्यात येत आहे. त्यामुळे येथे हाराकिरी भाजपची सत्ता डळमळीत करु शकते. त्यापार्श्वभूमीवर देशात इंधन दरवाढ केल्यास त्याचा फटका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकल्या तरी तुर्तास सरकारने त्यांच्याकडील जादुची कांडी फिरवली आहे. 7 मार्च रोजी मतदान संपत आहे. त्यानंतर अथवा एकदा निवडणुकीचे निकाल घोषीत झाले की, जनतेवर महागाईचे संकट कोसळणार हे सांगायला ज्योतिषी थोडाच लागणार आहे.

तेलाचा भाव 96 डॉलर प्रती बॅरल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 96 डॉलरवर पोहोचला आहे. लवकरच तो 100 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीं 2014 नंतर सर्वोच्च पातळीवर पोहचल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची भीती आहेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना निष्प्रभ ठरत असल्यामुळे तेलाची मागणी ही वाढली आहे. त्यामुळे ही किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

88 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर भारतात गेल्या 88 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. दिवाळीपासून इंधन दरवाढ झालेली नाही. उलट त्यावरील कर सवलतीमुळे अनेक राज्यात इंधनाच्या किंमती शंभरी अथवा त्यापेक्षा कमी झाल्या आहेत. देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून तेलाच्या किंमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. या वर्षात 1 ते 14 जानेवारी दरम्यान कच्चा तेलाच्या किंमतीत 18 ते 20 टक्क्यांची वाढ झालेली आहे. पण त्याचा कुठलाही परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर झालेला नाही. सहाजिकच एकदा निवडणुका आटोपल्या की सरकार किंमती वाढवेल अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचा भाव 68.87 डॉलर प्रति बॅरल होता. जो आता 96 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे, म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाचे दर 34 टक्क्यांनी वाढले आहेत.

या राज्यांतील निवडणुकांनी लावला महागाईला ब्रेक

4 नोव्हेंबर 2021 रोजीपूर्वी निवडणुकांमुळे दरवाढीला चाप लावण्यात आला होता. 17 मार्च 2020 ते 6 जून 2020 दरम्यान पेट्रोलच्या किंमतीवर अंकुश ठेवण्यात आला होता. कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ येथील निवडणुका होत्या. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी तेलाच्या किंमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. पण मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दुसऱ्याच दिवसापासून इंधन दरवाढ करण्यात आली होती.

एबीजी महाघोटाळा मनमोहन सरकारचं पाप, यूपीए काळातच खाती NPA; निर्मला सीतारमणांचा दावा

GOLD PRICE TODAY: 50 हजारांचा टप्पा पार, मुंबई ते नागपूर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे भाव

LIC IPO : विमाधारकांसाठी खूषखबर; आयपीओसाठी दावा मजबूत

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.