Bank holiday list : 26 मार्चपर्यंत करा तातडीची कामे, येत्या 10 दिवसात फक्त दोन दिवस उघडतील बँका

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बँक हॉलिडे आहेत. यामुळे आपली बँकिंगची कामे तात्काळ करुन घ्यावी. (Do urgent work till March 26, banks will open only two days in next 10 days)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:27 PM, 20 Mar 2021
Bank holiday list : 26 मार्चपर्यंत करा तातडीची कामे, येत्या 10 दिवसात फक्त दोन दिवस उघडतील बँका
येत्या 10 दिवसात फक्त दोन दिवस उघडतील बँका

नवी दिल्ली : आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असून बँकेसह वित्तीय क्षेत्रासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. सर्व बँकांना 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्षासाठी आपले खाते बंद करावे लागते. यामुळे जर बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर करा. जर आपण 26 मार्चपर्यंत बँकिंगचे काम पूर्ण केले नाही तर आपल्याला एक आठवडा जास्त काळ थांबावे लागेल. (Do urgent work till March 26, banks will open only two days in next 10 days)

बँक हॉलिडेमुळे वँका बंद

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बँक हॉलिडे आहेत. यामुळे आपली बँकिंगची कामे तात्काळ करुन घ्यावी. रविवार, 21 मार्च रोजी बँका बंद राहतील आणि 22 मार्च ते 26 मार्च दरम्यान बँका खुल्या असतील. त्यानंतर 27 मार्च रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे तर 28 मार्चला रविवार आहे, म्हणून दोन्ही दिवस बँका बंद राहतील. त्यानंतर 29 मार्चपासून नवीन आठवडा सुरू होईल. मात्र 29 मार्च रोजी होळीमुळे बँक बंद राहिल. 30 मार्च रोजी पाटण्यातील सर्व बँका बंद राहतील.

1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु

बुधवारी 31 मार्च हा सध्याच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी बँक खुली राहील, परंतु खाते बंद झाल्यामुळे बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाहीत. नवीन आर्थिक वर्ष (2021-22) 1 एप्रिलपासून सुरू होईल. 1 एप्रिल रोजी गुरुवार आहे आणि मार्च क्लोजिंगची प्रक्रिया पूर्ण करुन नवीन प्रक्रिया सुरु करायची असल्यामुळे बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जात नाहीत. म्हणजे दोन दिवस (31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बँक सर्वसामान्यांसाठी बंद असल्याचे समजते). बँक सरकारबरोबर आर्थिक व्यवहार करते आणि आपले खाते बंद करते.

बँक हॉलिडे यादी

– 27 मार्च महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक बंद
– 28 मार्च रोजी रविवार असल्याने बँक बंद
– 29 मार्चला होळीनिमित्त बँक बंद
– 30 मार्च को पटनातील बँका बंद राहणार, तथापि अन्य शहरांमध्ये बँका सुरु राहणार
– 31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सार्वजनिक व्यवहार बंद राहतील
– 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, बँक अकाउंट क्लोजिंगमध्ये व्यस्त असेल
– 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त बँक बंद राहिल
– 3 एप्रिलला बँक सुरु राहिल
– 4 एप्रिलला रविवार असल्याने बँक बंद राहिल
– 5 एप्रिलपासून बँकेते नियमित कामकाज सुरु होईल (Do urgent work till March 26, banks will open only two days in next 10 days)

इतर बातम्या

सावधान, तुम्हालाही RBI गव्हर्नरच्या नावाने मेल आलाय का? ‘असं’ आहे फसवणुकीचं संपूर्ण प्रकरण

वनप्लस वॉच 23 मार्चला होणार लाँच, जाणून घ्या वॉचची वैशिष्ट्ये आणि किंमत