Meta : संध्या देवनाथन माहिती आहेत का? कर्मचारी कपात होत असताना, मार्क झुकेरबर्गने का टाकला त्यांच्यावर विश्वास..

Meta : कर्मचारी कपातीचे धोरण सुरु असताना संध्या देवनाथन यांचे नाव चर्चेत आले आहे..

Meta : संध्या देवनाथन माहिती आहेत का? कर्मचारी कपात होत असताना, मार्क झुकेरबर्गने का टाकला त्यांच्यावर विश्वास..
नवीन उपाध्यक्षImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 9:51 PM

नवी दिल्ली : सर्वात मोठ्या सोशल (Social Media) प्लॅटफॉर्मपैकी एका Meta सध्या वादळातून जात आहे. अनेक निर्णय या कंपनीच्या अंगलट आले आहे. Meta म्हणजे आपलं पूर्वीचं Facebook बरं. तर या कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना (Lay Off) थेट घरी पाठवले आहे. पण या वादळी इनिंगमध्ये एक भारतीय नाव सध्या चर्चेत आले आहे.

तर आज एका भारतीय तरुणीचे नाव सध्या चर्चेले जात आहे. संध्या देवनाथन (Sandhya Devanathan) हे ते नाव आहे. त्यांना मेटा कंपनीच्या उपाध्यक्ष पदी (Vice President) नियुक्ती देण्यात आली आहे. अशा वाईट काळात मार्क झुकेरबर्गने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

गुरुवारी कंपनीने त्यांच्या नियुक्तीविषयीची माहिती दिली. संध्या मेटाचे सध्याचे उपाध्यक्ष अजीत मोहन यांची जागा घेतील. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेटा ही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मुळ कंपनी आहे.

हे सुद्धा वाचा

देवनाथन या लवकरच मेटाचं उपाध्यक्ष पद सांभाळतील. मेटाचे चीफ बिझनेस ऑफिसर Marne Levine यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी देवनाथन यांच्यामुळे कंपनीला फायदा होणार असल्याचे सांगितले.

देवनाथन या 2016 पासून मेटासोबत (अगोदरचे फेसबुक) जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी त्याकाळात सिंगापूर आणि व्हिएतनाम व्यवसाय वाढीसाठी मदत केली होती. त्यांनी दक्षिणपूर्व मेटाच्या ई-कॉमर्ससोबत ही काम केले होते.

त्यांनी इंडोनेशियातील मेटाचे APAC हा गेमिंग प्लॅटफॉर्मही सांभाळला आहे. 1 जानेवारी 2023 पासून त्या मेटाच्या उपाध्यक्ष पदी काम करतील. संध्या यांनी 1998 साली आंध्रा विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.

संध्या यांनी दिल्ली विद्यापीठातून MBA केले आहे. तर 2014 साली त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलचा लिडरशिप कोर्सही पूर्ण केला होता. सध्या मेटा गर्तेत अडकलं आहे. कंपनीला तरुण पण अनुभवी व्यक्तीची गरज होती. संध्या यांच्या रुपाने कंपनी ही सुरुवात करत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.