ट्रम्प यांनी फोडला अजून एक बॉम्ब; सोने 10 हजारांनी महागणार, अपडेट वाचली का?
Trump Tariff Bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने सध्या खळबळ उडवली आहे. त्याचा थेट परिणाम आता सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे. एका महिन्यात सोन्याच्या किंमतीत 100 ते 150 डॉलर प्रति औंसवर पोहचण्याची शक्यता आहे. सोने 10 हजारांनी महागण्याची शक्यता आहे.

अमेरिकेन सरकारने एक किलो आणि 100 औंस गोल्ड बार्सवर सुद्धा शुल्क आकारणी सुरू केली आहे. फायनेन्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, या निर्णयामुळे व्यापारावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वित्झर्लंड ते अमेरिकामध्ये सोने आणि चांदीच्या व्यापारावर त्याचा परिणाम होईल. अमेरिका सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण (CBP) च्या 31 जुलैच्या निर्णयानुसार, हे सोन्याचे बार 7108.13.5500 यावर शुल्क आकारल्या जाईल.
10 हजार रुपयांची तेजी
फायनेन्शिअल टाईम्सने या सर्व घडामोडींचा सर्वाधिक परिणाम स्वित्झर्लंडवर पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हा देश अमेरिकेला सोन्याचा सर्वाधिक पुरवठा करतो. त्यामुळे पुढील एका महिन्यात सोन्याच्या किंमती 100 ते 150 डॉलर प्रति औंस तेजी येण्याची शक्यता आहे. भारतीय वायदे बाजारात याचा परिणाम दिसेल. बाजारात 10 हजार रुपयांनी सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दाम वधारले आहेत. वायदे बाजारात तर सोन्याच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.
जागतिक बाजारात सोन्याचा विक्रम
अमेरिकेच्या गोल्ड टॅरिफच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचल्या. वायदे बाजारात सोन्याचा भाव दुपारी 12 वाजून 15 मिनिटावर 46 डॉलर प्रति औंसच्या तेजीसह 3,499.80 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. तर गोल्ड फ्युचर 3,534.10 डॉलर प्रति औंसच्या विक्रमी स्तरावर पोहचले आहे. युरोपमध्ये सोने 1.85 युरोच्या तेजीसह 2,914.16 युरो प्रति औंसवर पोहचले आहे. या घडामोडींपूर्वी 2024 च्या अखेरपर्यंत सोन्यात मोठी वाढ दिसून आली. या दरम्यान किंमतीत 27 टक्क्यांची वाढ दिसून आली.
भारतात सोन्याच्या किंमतीवर किती परिणाम?
भारतीय कमोडिटी बाजारात सोन्याच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचल्या आहेत. सोन्याचा भाव 509 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 1,01,977 रुपये औंसवर पोहचल्या. या वर्षात सोन्याच्या किंमतीत 25,502 रुपयांची वाढ दिसून आली. भारतीय गुंतवणूकदारांना सोन्याने 33.22 टक्के परतावा दिला आहे. भारतीय सराफा बाजारातही सोन्याने उसळी घेतली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स एसोसिएशन (IBJA) नुसार, 8 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,01,406 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. तर 916 शुद्ध सोने (22 कॅरेट) 1,01,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 750 शुद्ध (18 कॅरेट) सोने 76,055 रुपये प्रति 10 ग्रॅमने विक्री होत आहे. 585 (14 कॅरेट) शुद्ध सोन्याची किंमत 59,323 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
