किसान विकास पत्र : या स्किममध्ये मिळतात दुप्पट पैसे, सरकारकडून मिळते सुरक्षेची हमी

किसान विकास पत्र : या स्किममध्ये मिळतात दुप्पट पैसे, सरकारकडून मिळते सुरक्षेची हमी(earn double return on kisan vikas patra scheme)

किसान विकास पत्र : या स्किममध्ये मिळतात दुप्पट पैसे, सरकारकडून मिळते सुरक्षेची हमी
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती

नवी दिल्ली : छोट्या गुंतवणुकदारांसाठी भारतीय पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना एक उत्तम पर्याय आहे. ही वन टाईम इनव्हेस्टमेंट योजना असून, यात कमी दिवसात तुमचे पैसे दुप्पट होतात. याचे वैशिष्ट म्हणजे या योजनेची हमी सरकार स्वतः सरकार घेते. त्यामुळे गुंतवणुकीचे हे सुरक्षित माध्यम आहे. सध्या या योजनेत पैसे गुंतवल्यास तुमचे पैसे 124 महिन्यात म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतात. (earn double return on kisan vikas patra scheme)

किसान विकास पत्रची माहिती

किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने 1988 मध्ये लाँच केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मर्यादा नाही. सरकारने 2014मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र 50 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर 10 लाखांहून अधिक गुंतवणूक केली तर उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इनकम टॅक्स रिटर्न सोबत जोडावे लागते.

काय आहे वयोमर्यादा?

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकते. ग्रामीण भागात बँकेची सुविधा कमी असल्याने तेथे या योजनेचे आकर्षण अधिक आहे. या योजनेची खासियत म्हणजे मार्केटमध्ये कितीही उलाढाल झाली तरी या योजनेत रिटर्नची खात्री आहे. या योजनेत प्रत्येक तीन महिन्यांसाठी व्याजदर लागू होतो. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदर 6.9 टक्के असले तरी व्याजदर वर्षिक मोजले जाते. मात्र यात फायदा चांगला आहे.

टॅक्सचे नियम काय आहेत?

या योजनेत गुंतवणूक केल्यास 80 सी अंतर्गत टॅक्सचा लाभ मिळत नाही. तसेच रिटर्नही करपात्र आहे. मॅच्युरिटीनंतर रिटर्नवर टीडीएस कापला जात नाही. किसान पत्रच्या आधारे कर्जही घेता येते. या कर्जावर व्याजदर कमी असते.

किसान विकास पत्राचे प्रकार

किसान विकास पत्र मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात. सिंगल होल्डर टाईप सर्टिफिकेटमध्ये अॅडल्ट इंडिव्हिज्युअल किंवा अल्पवयीन ऐवजी सज्ञान व्यक्तीला जारी केले जाते. दोन व्यक्ती जॉईंट गुंतवणूक या योजनेत करु शकतात. यामध्ये मॅच्युरिटी रक्कम दोघांनाही मिळते किंवा जो हयात असेल त्याला 100 टक्के रक्कम मिळते. जॉईंट सर्टिफिकेटमध्ये आणखी एक Joint ‘B’ Type Certificate असते.(earn double return on kisan vikas patra scheme)

इतर बातम्या

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यात डीएच्या घोषणेची शक्यता

कमी पैशात अधिक लाभ देणारे हे आहेत पाच व्यवसाय

Published On - 6:48 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI