Share : Nykaa आणि Paytm ची पडझड रोखण्यासाठी धडपड! गुंतवणूकदारांवर पाडला सवलतींचा पाऊस

Share : Nykaa आणि Paytm ची बाजारात टिकून राहण्यासाठी निकराची लढाई सुरु झाली आहे..

Share : Nykaa आणि Paytm ची पडझड रोखण्यासाठी धडपड! गुंतवणूकदारांवर पाडला सवलतींचा पाऊस
घसरगुंडी थांबविण्यासाठी प्रयत्नImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 6:03 PM

नवी दिल्ली : गेल्यावर्षी दिग्गज सौंदर्यप्रसाधने आणि फॅशन जगातील ई-रिटेलर ब्रँड Nykaa ने बाजारात दमदार पदार्पण केले होते. त्याबरोबरच Paytm ही ढोल-ताशांच्या गजरात बाजारात दाखल झाले होते. या दोघांचा IPO बाजारात दाखल झाला होता. त्यावर गुंतवणूकदारांच्या डोळे झाकून उड्या पडल्या होत्या. शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध झाल्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण (Share Down) सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारच नाही तर कंपनीचाही जीव टांगणीला लागला आहे. ही घसरण रोखण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ही घसरण रोखण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना विविध सवलती घोषीत केल्या आहेत. एवढेच नाही तर गुंतवणूकदारांसाठी बायबॅक आणि बोनस शेअरचाही भडीमार सुरु केला आहे. त्यामुळे या घसरणीला आणि विक्रीला आळा बसवण्याची कंपनीची योजना आहे.

Nykaa ने 11 नोव्हेंबर रोजी बोनस इश्यू करण्याची घोषणा केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार पुन्हा कंपनीकडे ओढून आणण्यासाठी कंपनीने हे रणनीती आखली आहे. बोनस इश्यू हे गुंतवणूकदारांना दिलेले मोफत अतिरिक्त शेअर आहे. सूचीबद्ध कंपन्या त्यांच्या शेअरधारकांसाठी ही ऑफर आणतात.

हे सुद्धा वाचा

Nykaa ने सध्या 5:1 या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस इश्यू करणार आहे. याचा अर्थ जर शेअरधारकाकडे 1 शेअर असेल तर त्याला त्या बदल्यात 5 शेअर देण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीओ दरम्यान गुंतवणूकदारांनी जी रक्कम गुंतवली आणि घसरणीनंतर त्याचा जो भ्रमनिरास झाला, त्याची भरपाई करता येईल.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications च्या संचालक मंडळाने शेअर बायबँकला मंजूरी दिली आहे. यामुळे कंपनी खूल्या बाजारातून 850 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करणार आहे. कमीत कमी बायबॅक साईज आणि जास्तीत जास्त बायबॅक प्राईस या धोरणाचा कंपनी अवलंब करणार आहे.

Paytm ने कमीत कमी 5,246,913 इक्विटी शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बायबॅक धोरणानुसार कंपनी 810 रुपयांवर प्रत्येक शेअरची खरेदी करणार आहे. पण एवढे करुनही नाराज गुंतवणूकदार पुन्हा कंपनीकडे परत फिरणार का हा मुद्दा आहे.

Non Stop LIVE Update
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.
...तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध
...तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध.